संभलचे सत्य जाणून घेणे हा आमचा हक्क

09 Jan 2025 05:55:00
दृष्टिक्षेप 
आचार्य प्रमोद कृष्णम यांचे प्रतिपादन
 
प्रश्न : आचार्यजी, कल्की धामच्या स्थापनेमागील दृष्टिकोन सांगू शकाल का? सनातन हिंदू धर्माच्या त्याचे काय महत्त्व आहे?
उत्तर : आमच्या शास्त्र ग्रंथांमध्ये, पुराणात कल्की धामचे महत्त्व सखोलपणे सांगितले आहे. स्कंद पुराण, भविष्य पुराण, कल्की पुराण यात याविषयावर सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. तसेच भगवान श्रीविष्णूंचा अंतिम अवतार श्री कल्की नारायण याच भूमीवर अवतरणार असल्याचा उल्लेख श्रीमद् भगवद् गीतेमध्ये आहे. या ग्रंथांत या पवित्र महत्त्व स्पष्टपणे वर्णिलेले आहे, जे संभल म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षांपासून संत, ऋषी आणि विद्वानांनी या संदर्भांचे विस्तृतपणे वाचन, संशोधन केले आहे आणि त्याचा अर्थ लावला आहे. या संदर्भातील सर्वात सुप्रसिद्ध श्लोकांपैकी एक म्हणजे, ‘‘जेव्हा संपूर्ण विश्व अंधाराने व्यापले जाईल, तेव्हा संभल हे दैवी स्थान म्हणून उदयास येईल. कल्कीचा संभल गावात एका सद्गुणी, पुण्यवान ब्राह्मणाच्या घरी होईल.’’
शास्त्रग्रंथांमध्ये ६८ पवित्र स्थळे, १९ विहिरी आणि भगवान ब्रह्मदेवाने स्थापन केलेले मध्यवर्ती शिवलिंग असलेले ठिकाण म्हणूनही संभलचे वर्णन करण्यात आले आहे. ही सर्व वैशिष्ट्ये येथील भूमीच्या वर्णनाशी जुळतात. Acharya Pramod Krishnam'
 
 
Aacharya-3
 
प्रश्न : या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली आणि कल्की धामची स्थापना करताना आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागला?
उत्तर : कल्की धामची संकल्पना १८ वर्षांपूर्वी मांडण्यात आली, जेव्हा मी शास्त्रग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे भगवान कल्कीच्या आगमनाची तयारी करण्याची आवश्यकता लक्षात घेतली. नोव्हेंबर २००७ मध्ये, जेव्हा माझी श्री कल्की पीठाचे प्रमुख म्हणून औपचारिक नियुक्ती झाली तेव्हा मी आध्यात्मिक समुदायासमोर कल्की धामची स्थापना करण्याची संकल्पना मांडली. हा प्रवास आव्हानांनी भरलेला होता. दिग्विजय सिंह, भूपिंदरसिंह हुडा यांच्यासारखे वरिष्ठ काँग्रेस नेते आणि अन्य लोक कल्की धामच्या स्थापनेबाबत २०१६ मध्ये झालेल्या आमच्या बैठकीचा भाग होते. पण जेव्हा उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे सरकार आले तेव्हा त्यांनी प्रकल्पनिर्मितीवर बंदी आणली.
Acharya Pramod Krishnam' : स्थानिक अधिकार्‍यांनी संभाव्य सांप्रदायिक अशांतीचे कारण देत बांधकामावर निर्बंध जमिनीवर आमचा हक्क सांगण्यासाठी आम्हाला उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचे दार अनेकदा ठोठावावे लागले. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर ऑगस्ट २०२३ मध्ये, अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि कल्की धाम बांधण्याचा आमचा घटनात्मक अधिकार मान्य केला.
 
 
प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या सुरुवातीला कल्की पायाभरणी केली होती. जेव्हा तुम्ही हा प्रकल्प त्यांच्यासमोर मांडला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती?
उत्तर : पंतप्रधानांनी कल्की धामचे महत्त्व समजून घेतले आणि नम्रतापापूर्वक आमचा प्रस्ताव स्वीकारला. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी या पवित्र भूमीला भेट दिली, अभिवादन केले आणि वैयक्तिक रीत्या पायाभरणी केली. हा आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाचा आनंदाचा क्षण होता.
 
 
प्रश्न : काही लोकांचा असा दावा आहे की शास्त्रग्रंथात नमूद केलेले ‘संभल’ हे ओडिशातील संबलपूर सारख्या इतर ठिकाणीही असू शकते. तुम्ही या दाव्यांचे निराकरण कसे करता?
उत्तर : हा प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. वस्तुस्थिती ही आहे की संभलचे अचूक स्थान ओळखण्यासाठी आम्ही सखोल संशोधन केले. शास्त्रग्रंथात स्पष्टपणे वर्णन केले आहे की, या जागेवर ६८ पवित्र स्थाने असतील, मध्यवर्ती ठिकाणी एक शिवलिंग असेल आणि त्याच्या दक्षिणेला गंगा नदीचा प्रवाह असेल. या सर्व वर्णनांशी संभलचे वर्णन जुळते.
 
 
प्रश्न : अलीकडेच, न्यायालयाने आदेश दिलेल्या वादग्रस्त जागेच्या (हरिहर मंदिर/शाही जामा मशीद) सर्वेक्षणादरम्यान संभलमध्ये हिंसक घटना घडल्याचे या देशाने पाहिले. आणि न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयोगाच्या सदस्यांवर दगडफफेक करण्यात आली. ही अशांतता कशामुळे निर्माण झाली असे आपल्याला वाटते?
उत्तर : हा हिंदू आणि मुसलमान यांच्यातील जातीय संघर्ष नव्हता. हा हिंसाचार समाजवादी पक्षाने घडवून आणला होता. हे एक राजकीय षडयंत्र होते. समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी अराजकता निर्माण करण्यासाठी लोकांना भडकावले.
 
 
प्रश्न : एक महत्त्वाचे व गंभीर विधान आहे. या हिंसाचाराला समाजवादी पक्ष जबाबदार आहे, असे आपल्याला म्हणायचे आहे काय?
उत्तर : होय, निश्चितच. समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते यात सामील होते आणि त्यांच्या कृतीमुळेच अशांतता निर्माण झाली. एवढेच नव्हे तर खुद्द अखिलेश यादवही या कटातून मुक्त होऊ शकत नाहीत. ते जर यात नसते तर अखिलेश यांनी आपल्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांवर कारवाई केली असती, ज्यांनी हा हिंसाचार भडकावला.
 
 
प्रश्न : अखिलेश यादव यांनी या अशांततेचे थेट समर्थन केले, असे आपल्याला म्हणायचे आहे काय?
उत्तर : जर त्यांनी तसे केले नसेल तर अखिलेश यांनी त्यांच्या पक्षातील सदस्यांना नोटिस का बजावली नाही? हा सरकारचा मुद्दा किंवा स्थानिक प्रशासकीय निर्णयही नव्हता. न्यायालयाने दाव्यांची पडताळणी करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले आणि त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची होती. तरीही, दगडफफेक झालीच, जमाव जमला आणि अराजकता माजली. हा एक राजकीय संघर्ष होता - संभलमध्ये अशांतता निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता.
 
 
प्रश्न : हम हर मस्जिद के नीचे मंदिर ढुंंढेंगे’ असा युक्तिवाद अनेकजण करतात. त्यांचे म्हणणे आहे की जुनी धार्मिक वादग्रस्त स्थळे खोदल्याने सामाजिक सलोखा बिघडू शकतो. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?
उत्तर : सनातन हिंदू धर्म आपल्याला सर्व धर्मांचा आदर करायला शिकवतो. आमचा धर्म हिंसा किंवा द्वेषाला परवानगी देत ??नाही. तथापि, सत्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे. आम्ही मशिदी नष्ट करण्याचे समर्थन करीत नाही. परंतु यापूर्वी भूतकाळात अनेक मंदिरांचा विध्वंस करण्यात आला होता याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भूतकाळ खोदण्याचा मुद्दा नाही तर आपला इतिहास, अस्तित्व आणि अस्मिता जपण्याचा प्रश्न आहे. संभलचे सत्य जाणून घेणे हा आमचा हक्क आहे आणि एकदा बाहेर पडल्यानंतर ते संपूर्ण देशभरात धक्कादायक लाटा पसरवेल याची मी तुम्हाला खात्री देतो.
 
 
प्रश्न : कल्की धामचे बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत काय आहे?
उत्तर : आमचे वास्तुविशारद आणि अभियंते कल्की धाम येथे एक आगळ्या प्रकारच्या मंदिराची निर्मिती करीत आहेत. दैवी घटनांनंतर उभारण्यात आलेल्या इतर पवित्र स्थळांपेक्षा अगदी वेगळे हे भगवान कल्कीचे पहिले मंदिर असेल. यात भगवान विष्णूंच्या दहा अवतारांना आणि माता वैष्णो देवीच्या एका अवताराला समर्पित अकरा गर्भगृह असतील. येत्या काही वर्षांत बांधकाम पूर्ण होईल, अशी आम्हाला आशा आहे.
 
 
प्रश्न : आचार्यजी, तुमचा पूर्वीपासून राजकारणाशी संबंध होता. भविष्यात एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होण्याचा आपला विचार आहे काय
उत्तर : कल्की धामची उभारणी हेच माझे एकमेव लक्ष्य आहे. या दैवी कार्यात राजकारण हे दुय्यम आहे. या पवित्र कार्याचा भाग होण्यात जे समाधान, सन्मान आणि आनंद आहे त्याची कोणत्याही पदाशी किंवा पदवीशी तुलना होऊ शकत नाही. Acharya Pramod Krishnam'
 
(ऑर्गनायझरवरून साभार)
Powered By Sangraha 9.0