विश्लेषण
- बलबीर पुंज
भाग १
Dr. Babasaheb Ambedkar : काँग्रेस आणि डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांचा प्रभाव परस्पर विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करीत आहे का? तर याचे उत्तर होय असे आहे. भारतीय राजकारणात काँग्रेसची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक खराब होत असताना, देशाच्या वर्तमान कथनात डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व परिवर्तनाचे, चेतनेचे आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक झपाट्याने उदयास येत आहे. डॉ. आंबेडकरांचा कोण द्वेष करायचे आणि का? २० व्या शतकातील या महान भारतीय समाजसुधारकाचा १९५६ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत कोणी तिरस्कार केला आणि कोणी त्यांची भारतीय राजकारणात उपेक्षा केली?
काँग्रेसचा ढोंगीपणा आणि संधिसाधूपणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगण्याच्या प्रयत्नात काँग्रेस वैचारिक गोंधळाच्या, संभ्रमाच्या भोवर्यात बुडत आहे. नेहरूंनी डॉ. बाबासाहेबांची किती अवहेलना केली हे संपूर्ण जगाला माहीत आहे. १९५५ मध्ये पंतप्रधान असताना स्वत:ला ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात त्यांना अजिबात संकोच वाटला नाही, तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेबांना हा सन्मान मिळण्यासाठी तब्बल ३५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. काँग्रेसचे बंडखोर नेते विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय मोर्चा सरकार (भाजपा डावे पक्ष समर्थित) ने १९९० मध्ये इतिहासात झालेल्या या अन्यायाचा अंत करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान केला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचे तैलचित्र लावण्यात आले आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा लागू झाला. जवाहरलाल नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘खलनायक’ म्हणून चित्रित केले होते आणि जनमानसात असलेली त्यांची महान प्रतिमा डागाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. आज त्याच काँग्रेस पक्षाला आपली बुडणारी राजकीय नौका पैलतीरावर नेण्यासाठी आणि आपले भाग्य उजळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करण्यात अजिबात संकोच वाटत नाही. हा काँग्रेस नेतृत्वाच्या ढोंगीपणाचा आणि संधिसाधूपणाचा कळस आहे.
डॉ. आंबेडकरांशी कटू संबंध
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी काँग्रेसचे संबंध स्पष्टपणे दोन विविध टप्प्यांत विभागले जाऊ शकतात. पहिला, गांधीजी हयात असतानाचा काळ आणि दुसरा ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींच्या दुर्दैवी हत्येनंतरचा कालखंड. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यूनंतर (१५ डिसेंबर १९५०) काँग्रेसची सर्व सूत्रे नेहरूंच्या हाती आली. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जवाहरलाल नेहरूंच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे आवरण उघड लागले. त्यांच्याशी वैचारिक मुद्यांवर असहमत असलेल्या अर्थात त्यांच्याशी वैचारिक मतभेद असलेल्या किंवा ज्यांच्याशी त्यांचे वैयक्तिक वैमनस्य होते अशा सर्व नेत्यांची (काँग्रेसमधील किंवा बाहेरील) राजकीय कारकीर्द त्यांनी संपवली.
जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या घराण्यातील इतर लोकांप्रमाणेच वर्चस्वाच्या भावनेने ग्रासले होते. पंडित नेहरूंची वर्चस्ववादी भावना नाकारणार्या व त्यांच्या मतांशी सहमत नसलेल्या लोकांचा अनुभव, ज्ञान आणि बौद्धिक क्षमतेकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. मात्र, गांधीजींची दृष्टी सर्वसमावेशक होती. त्यांनी नेहरूंना आपल्या मंत्रिमंडळात तीन गैरकाँग्रेसी नेत्यांचा समावेश करण्यास राजी केले होते. हे तिघे होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (ज्यांना नंतर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि सरदार बलदेव सिंह. मुखर्जी यांचा नेहरूंचे मित्र शेख अब्दुल्ला सरकारचे कैदी असताना काश्मीर तुरुंगात रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांना देखील नेहरूंच्या विरोधाचा फटका सहन करावा लागला. संसदीय निवडणुकीत ( नेहरूंच्या सांगण्यावरून यात हेराफेरी झाली असे मानण्यात येते) पराभव झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांना भारतीय राजकारणाच्या सत्तेच्या संरचनेपासून नेहमी दूरच ठेवले गेले
नेहरूंच्या सूडबुद्धीचा बळी
Dr. Babasaheb Ambedkar : १९५२ मध्ये डॉ. आंबेडकरांनी नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध नारायणराव काजरोळकर यांना उमेदवारी दिली. श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाने बाबासाहेबांचा अपमानित करण्यासाठी त्यांना ‘देशद्रोही’ म्हटले. डॉ. आंबेडकरांचा सुमारे १४,००० मतांनी पराभव झाला, तर ७८,००० मते अवैध घोषित करण्यात आली. त्यामुळे या हेराफेरी झाल्याचे स्पष्ट झाले. डॉ. आंबेडकरांच्या पराभवानंतर नेहरूंनी आनंद व्यक्त केला. १६ जानेवारी १९५२ रोजी त्यांनी आपली निकटची मैत्रीण लेडी एडविना माउंटबॅटन यांना पत्रात लिहिले, ‘बॉम्बे शहरात आणि विशेषत: संपूर्ण बॉम्बे प्रांतात आमचे यश अपेक्षेपेक्षा जास्त राहिले. आंबेडकर पराभूत झाले आहेत. याआधी राजकुमारी अमृत कौर यांना लिहिलेल्या पत्रात (२६ १९४६) नेहरूंनी बाबासाहेबांप्रती आपली दुर्भावना या शब्दांत व्यक्त केली होती, ‘...मी सर्वांत जास्त यावर भर देत होतो की आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारशी युती केली आहे आणि ते काँग्रेसच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करू शकत नव्हतो.’’ आज तीच काँग्रेस आणि नेहरूंचे पणतू व पणती भारतीय राजकीय पटलावर अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आंबेडकरांच्या वारशाशी स्वत:ला जोडण्याची त्यांची धडपड सुरू आहे.
नेहरूंचे मुस्लिम प्रेम
जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांचाही एकमेकांवर विश्वास नव्हता. नेहरूंची मुस्लिमांबद्दलची आसक्ती एवढी खोलवर होती की, त्यांना दुसरा कुठलाही कमकुवत, दुर्बल वर्ग दिसतच नव्हता. याच गोष्टीची बाबासाहेबांना चीड होती. १० १९५१ रोजी राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले होते, ‘पंतप्रधानांचा संपूर्ण वेळ आणि लक्ष मुस्लिमांच्या सुरक्षेसाठी समर्पित आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की केवळ मुसलमानांनाच सुरक्षेची गरज आहे काय? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भारतीय ख्रिश्चनांना सुरक्षेची गरज नाही का?’’
राहुल गांधी यांची काँग्रेस डॉ. बाबासाहेबांचा राजकीय वारसा स्वीकारू शकेल जवाहरलाल नेहरूंचा डॉ. बाबासाहेबांबद्दलचा द्वेष, त्यांची नापसंती आणि आंबेडकरांचा नेहरूंबद्दलचा अविश्वास पाहता हे जवळजवळ अशक्य वाटते. नेहरू आणि डॉ. आंबेडकर हे दोन्ही त्यांच्या अस्तित्वाचा भाग आहेत. लोकांची स्मरणशक्ती कमकुवत आहे आणि ते सर्व काही विसरले असतील, असे पक्षाला वाटत असावे. काँग्रेसचे हे नाटक आणखी किती दिवस चालणार? याचे उत्तर काळच देऊ शकतो.
Dr. Babasaheb Ambedkar : मात्र, डॉ. बाबासाहेबांचे गांधीजींशीही मतभेद होते. कधी कधी मतभेद खूप तीव्र होत असत. मात्र, तरी दोघेही एकाच मार्गावरील प्रवासी होते, कारण त्यांचा अजेंडा काही मर्यादेपर्यंत एकसारखाच होता. भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे आणि लाखो लोकांच्या सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी कार्य करणे हे गांधीजींचे मुख्य ध्येय होते. विविध जातींमध्ये हिंदू समाजव्यवस्थेतील अस्पृश्यतेसारख्या मागासलेल्या सामाजिक प्रथांची वेदना झेलणार्यांना गांधीजींनी हरिजन (परमेश्वराचे पुत्र) असे नाव दिले. हा विषय त्यांच्यासाठी अतिशय संवेदनशील होता. दलित म्हणून जन्मलेल्या बाबासाहेबांनी स्वत: दलित असल्याच्या वेदना आणि अपमान सहन केला होता. त्यामुळे अस्पृश्यता दूर करण्यासाठी आणि आपल्या समाजातील लोकांची स्थिती सुधारण्याच्या दिशेने कार्य करणे त्यांच्यासाठी अत्यंत होते. दोन्ही नेत्यांचे ध्येय एकच होते, फक्त त्यांच्या पद्धती वेगळ्या होत्या. जेव्हा ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद करीत एक विभाजनवादी जातीयवादी प्रस्ताव सादर केला तेव्हा दोघांमधील मतभेद वाढले, कारण बाबासाहेबांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. यामुळे दलितांचे हित साधण्यासाठी सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.१९३३ मध्ये महात्मा आपल्या ‘हरिजन’ मासिकासाठी डॉ. आंबेडकर यांना एक संदेश लिहिण्यास सांगितले. डॉ. आंबेडकरांनी जातिव्यवस्थेवर जोरदार हल्ला चढविताना लिहिले, ‘जाति-बहिष्कृत लोक जाती व्यवस्थेचा परिणाम आहेत. जोपर्यंत जाती आहेत, तोपर्यंत बहिष्कृत लोकही असतील. जातिव्यवस्था नष्ट केल्याशिवाय बहिष्कृत लोकांची मुक्ती होऊ शकत नाही. या घृणास्पद आणि क्रूर रुढीवादातून हिंदू धर्माची मुक्तता झाली तरच संघर्षात हिंदूंचे अस्तित्व टिकून राहील.’’तेव्हा बाबासाहेब कोणत्या ‘आगामी संघर्षाकडे’ संकेत करीत होते? त्यावेळी (१९३० नंतर) वाढत्या हिंदू-मुसलमान तणावाचा ते स्पष्टपणे संदर्भ देत होते, ज्याची परिणती शेवटी रक्तरंजित फाळणीत झाली आणि पाकिस्तान या स्वतंत्र इस्लामिक देशाची निर्मिती झाली, ज्यामध्ये हिंदू, बौद्ध आणि शीख यांना काहीही स्थान नव्हते. देशाच्या क्षितिजावर घिरट्या भीषण संकटाची चाहूल खूप आधीच बाबाहेबांना लागली होती. भविष्यातील भयंकर विनाश ओळखण्याची राजकीय बुद्धी बाबासाहेबांकडे होती. दु:खाची गोष्ट म्हणजे त्या काळातील बहुतेक काँग्रेसी नेत्यांमध्ये या दूरदृष्टीचा अभाव होता.
डॉ. आंबेडकर आणि हिंदुत्व : नैसर्गिक नाते
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुत्व चळवळ यांचा नैसर्गिक संबंध आहे. ‘हिंदुत्व’ हा शब्द वापरणार्या काही लोकांपैकी बाबासाहेब एक होते. १९१६ मध्ये, त्यांनी कोलंबिया विद्यापीठात मानववंशशास्त्राशी संबंधित एका परिसंवादात एक संशोधनपर पेपर सादर केला होता, ज्यामध्ये ते म्हणाले, ‘सांस्कृतिक एकता हा एकजिनसीपणाचा आधार आहे. हे ओळखून मी छातीठोकपणे सांगतो की, सांस्कृतिक एकात्मतेच्या बाबतीत बरोबरी करू शकणारा एकही देश भारतीय उपखंडात नाही. केवळ भौगोलिक अखंडता तर त्याहूनही महत्त्वाची आणि आधारभूत एकता आहे-एक निर्विवाद सांस्कृतिक एकता, ज्याद्वारे संपूर्ण देश एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जोडला गेला आहे.’
Dr. Babasaheb Ambedkar : मंदिर प्रवेशाच्या मुद्यावर १९२७ मध्ये जारी केलेल्या निवेदनात बाबासाहेब म्हणाले होते, ‘आम्ही ज्या महत्त्वाच्या मुद्यावर जोर देऊ इच्छितो तो हा नाही की परमेश्वराची पूजा करून तुम्हाला समाधान मिळते... हिंदुत्व अन्य हिंदूंचे आहे तेवढेच अस्पृश्य हिंदूंचेही आहे. हिंदुत्वाच्या जडणघडणीत व गौरव गाथेत महर्षी वसिष्ठांसारखे ब्राह्मण, कृष्णासारखे क्षत्रिय, हर्ष सारखे वैश्य आणि तुकारामांसारख्या शूद्रांनी जेवढे योगदान दिले तेवढेच योगदान महर्षी वाल्मीकि, व्याध गीताचे संत, संत चोखामेळा आणि संत रैदास इत्यादींनी दिले. हिंदूंच्या रक्षणासाठी शिदनाक महार यांच्यासारखे अगणित वीर लढले. हिंदुत्वाच्या बांधलेले मंदिर, जे हळूहळू विकसित आणि समृद्ध होत गेले, त्यात अस्पृश्यांसह सर्व हिंदूंच्या त्यागाचा समावेश होता. त्यामुळे असे मंदिर सर्व हिंदूंसाठी खुले असले पाहिजे, मग तो कोणत्याही जातीचा असो. (बहिष्कृत भारत, २७ नोव्हेंबर १९२७ ; धनंजय कीर लिखित ‘डॉ. आंबेडकर : लाईफ अँड मिशन’, १९५४ मधून उद्धृत)
(पांचजन्यवरून)