ते चौघे अन् वार्षिक 20 हजार!

01 Feb 2025 18:53:43
सतीश वखरे
हिंगणघाट,
Hinganghat News : दुर्दैव पाठीशी लागावं? पण ते किती? एक चिमुकला जीवन वय वर्षे केवळ 11. वडील देवाघरी गेलेले. आई असाध्य विकाराने आजारी. नवरा गेल्यानंतर आधारासाठी त्या माय लेकी गेली आपल्या अठराविश्‍व दारिद्य्र असलेल्या आईच्या 10 बाय×10 च्या चंद्रमोळी झोपडत! वरती गळक्या टीनाचं छप्पर. टीना फुटलेल्या. आधीच त्या घरात वृद्ध आजी आणि तिचा मतीमंद मुलगा. आणि ती माहेरी आश्रयाला आली. आधीच दोघा माय लेकरांची अन्नान दशा. त्यात भर पडली दोन मायलेकीची. ते चौघं अन् वार्षिक उत्प्न 20 हजार! 
 
 
 
hgt
 
 
 
कसा जगत असेल तो परिवार, पुन्हा एकदा दुर्दैव त्यांची पाठ सोडायला तयार नव्हत. त्या 11 वर्षाच्या उत्कर्षाला सोरायसिसने गाठले. येथील भारत विद्यालयात ती पाचव्या वर्गात शिकत आहे. हे दुर्दैवाचे दशावतार येथेच थांबत नाहीत. आजीची समुद्रपूर तालुक्यात चार एकरचे शेत आहे. परंतु, बाजूने नाला गेल्याने पावसाळ्यात कोणतेही पीक या शेतात घेता येत नाही. घरी शेती करणारे कोणी नसल्याने शेती मक्त्याने दिली. वर्षातून एकदा मिळणारा 20 हजार रुपयाचा मक्ता हा त्या चार जणांच्या कुटुंबांच्या जगण्याचा आधार. मग सोरायसिसने आजारी मुलीवर उपचार कुठून आणि कसा करणार. तशातच खासगी रुग्णालय चालवीणार्‍या समाजसेवेची जाणीव हृदयात जपणार्‍या रोमीला खांडरे या त्वचा रोग डॉक्टरकडे अभिनव विचार मंचचे कार्यकर्ते त्या मुलीला घेऊन गेले.
 
 
त्यांनी माणुसकी दाखवत तिच्यावर योग्य उपचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मग अभिनव विचार मंच अंतर्गत अभिनव सहाय्यता निधी या संघटनेला या मुली संदर्भात मातृत्वाचा खरा खुरा पान्हा फुटला. त्यांनी अभिनव सहाय्यता समितीने तिचा औषधोपचार व दहावी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलला. अभिनव विचार मंच अभिनव विचार मंच अंतर्गत अभिनव सहाय्यता निधीचे आरोग्य विभाग प्रमुख प्रसाद पाचखेडे यांंच्या सोबत संपर्क साधा असे आवाहन अभिनव विचार मंच यांनी केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0