मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘मुंबई टेक वीक’ची घोषणा

12 Feb 2025 21:47:35
- आशियातील सर्वांत मोठा कार्यक्रम
 
मुंबई, 
'Mumbai Tech Week' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबईच्या (टीम) बैठकीत मुंबईच्या टेक इकोसिस्टमला आणि आगामी मुंबई टेक वीक २०२५ : आशियातील सर्वांत मोठा एआय महोत्सवाला सरकारचा पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी ‘आशियातील एआय सँडबॉक्स’ म्हणून मुंबईचे स्थान मजबूत करण्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित व्हिजनचा प्रमुख भागीदार म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजनाची शक्ती आणि महत्त्व यावर भर दिला.
 
 
devendra
 
'Mumbai Tech Week' : मुख्यमंत्र्यांनी ‘टीम’सोबतच्या भागीदारीबद्दल सरकारची वचनबद्धता अधोरेखित करून व्हिडीओ संदेशाद्वारे सर्वांना एमटीडब्ल्यू २०२५ मध्ये औपचारिकपणे आमंत्रित केले. मुंबईच्या टेक लॅण्डस्केपचा विकास करण्यासाठी ‘टीम’च्या प्रभाव आणि प्रयत्नांबद्दल फडणवीस यांनी कौतुक केले. त्यांनी ६५ हून अधिक स्टार्टअप्स आणि युनिकॉर्नच्या समावेश असलेल्या त्यांच्या लक्षणीय वाढीची नोंद केली. मुंबई ही दीर्घकाळापासून उद्योजकीय क्रियाकलापांचा पाया आहे आणि सरकार ‘टीम’सोबत भागीदारीत, शहर बांधण्यासाठी नवीन युगातील उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.
 
 
'Mumbai Tech Week' : मुख्यमंत्री फडणवीस यांनी भागीदारीवर भर दिला आणि तंत्रज्ञानाच्या प्रतिभेचे संगोपन, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि नवोपक्रमाला चालना देणे लक्ष केंद्रित केले. मुंबई महिलांसाठी भारतातील सर्वांत सुरक्षित शहर असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंत्रज्ञानात महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि संबंधित उपक्रमांना पाठिंबा देण्याचे वचन दिले. टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीम) ही एक गैरलाभकारी, स्वतंत्र उद्योग संघटना आहे. ती मुंबईच्या टेक इकोसिस्टमला पुढे नेण्याच्या ध्येयाने स्थापन करण्यात आहे. शहरातील काही सर्वांत यशस्वी टेक संस्थापकांनी स्थापन केलेली ‘टीम’ ही मुंबईला तंत्रज्ञान उद्योजकतेचे केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे.
Powered By Sangraha 9.0