- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई,
नक्षलवाद्यांसोबत मंगळवारी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले सी-६० दलातील कॉन्स्टेबल महेश नागुलवार यांच्या कुटुंबीयांना दोन कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महेश नागुलवार गंभीर जखमी होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातली फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि सी-६० दलात चकमक झडली, असे CM Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गोळी लागल्याने नागुलवार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने गडचिरोलीला हलवण्यात आले, असे फडणवीस यांनी मंगळवारी उशिरा ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. भारत नक्षलमुक्त करण्याच्या मोहिमेत नागुलवार यांनी बलिदान कधीच विसरू शकणार नाही. देशासाठी त्यांनी केलेले बलिदान वाया जाणार नाही, असे CM Devendra Fadnavis फडणवीस म्हणाले.