आयात शुल्क लादल्याने जागतिक व्यापार संकटात

    दिनांक :12-Feb-2025
Total Views |
- ट्रम्प यांच्या निर्णयावर युरोपियन महासंघाची भूमिका
 
जिनेव्हा, 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमसह विविध वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला युरोपियन महासंघाने कडाडून विरोध केला. अतिरिक्त आयात शुल्क लादल्याने जागतिक व्यापार येणार असल्याचे युरोपियन महासंघाच्या प्रमुख हर्सुला वोन डेर लेयेन यांनी म्हटले आहे.
 
 
Donald Trump
 
Donald Trump : युरोपियन महासंघाच्या २७ सदस्य देशांनी आयात शुल्क लादण्याबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात तक्रार केली. त्यानंतर महासंघाच्या प्रमुख लेयेन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, अतिरिक्त आयात शुल्क लादण्याच्या ट्रम्प यांच्या अन्यायकारक निर्णयाला युरोपियन महासंघ लवकरच सडेतोड उत्तर अमेरिकेला या निर्णयाची किंमत चुकवावी लागेल. महासंघाचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. त्यांच्या निर्णयाला सदस्य देशांनी विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. याच विषयावर जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ म्हणाले, अमेरिकेचा निर्णय द्विपक्षीय व्यापारासाठी अन्यायकारक आहे. त्यांना अतिरिक्त आयात शुल्क लावण्याशिवाय पर्याय नसल्यास आम्हालाही कठोर निर्णय घ्यावा लागेल. युरोपियन महासंघाच्या देशांनी एकत्र येऊन याविरोधात आक्षेप घ्यायला हवा.

उत्पादनांच्या साखळीवर होणार परिणाम
अतिरिक्त आयात शुल्क लादल्याने उत्पादनांच्या साखळीवर तसेच व्यापार आणि गुंतवणुकीच्या करारावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे युरोपियन युनियन महासंघाचे उपाध्यक्ष मारोस सेफकोव्हिक यांनी म्हटले आहे. दरम्यान २०१८ मध्ये ट्रम्प सत्तेवर असताना अशाच प्रकारे अतिरिक्त आयात शुल्क लादले होते. युरोपियन महासंघाने प्रत्युत्तर देत अमेरिकेत तयार होणार्‍या दुचाकी, बुरबॉनची उत्पादने, शेंगदाण्याचे तेल, जिन्स आदी उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता.