भारतात गुंतवणूक करण्याची हीच वेळ

12 Feb 2025 21:20:51
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फ्रान्समधील उद्योजकांना आवाहन
 
पॅरिस, 
India-France : भारत २०४७ पर्यंत विकसित देश बनण्याच्या दिशेने काम करीत आहे. त्यामुळे उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील गुंतवणूकदारांना केले. १४ व्या भारत-फ्रान्स सीईओ फोरमला मंगळवारी संबोधित करताना मोदी म्हणाले, भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश सर्वोत्तम विचारांचा संगम आहे. तुम्ही सर्वजण नवोन्मेष, सहयोग आणि एकात्मिकतेचे लक्ष्य समोर ठेऊन काम करीत आहात.
 
 
PM Modi
 
India-France : तुमच्यामुळेच भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी मजबूत होत आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जेच्या उद्दिष्टांसह काम करीत आहोत. हे क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठीदेखील खुले करण्यात आले. आज भारत वेगाने जागतिक गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनत आहे. गेल्या दशकात भारतात झालेल्या परिवर्तनकारी बदलांची तुम्हाला जाणीव आहे. आम्ही सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन या मार्गावर पुढे जात आहे.
 
भारत लवकरच तिसरी मोठी
जागतिक स्तरावर आमची ओळख अशी आहे की, आज भारत वेगाने जागतिक गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनत आहे. आम्ही सेमीकंडक्टर आणि क्वांटम मिशन सुरू केले आहे. संरक्षण क्षेत्रातही ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ ला प्रोत्साहन देत आहोत. जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी मोठी बनणार असल्याचे यावेळी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0