वृंदावन नगरमधील ओजस रमेश बाहेकरची आत्महत्या

12 Feb 2025 19:55:32
बुलढाणा,
suicide case : येथील शौर्यचक्र विजेते रमेश बाहेकर यांना पुत्रशोक झाला आहे. वृंदावन नगरमध्ये ओम (ओजस) रमेश बाहेकर याने फाशी लावून आत्महत्या केली. आज दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान घरात कुणी नसतांना त्याने हे दुर्दैवी पाऊल उचलले. मृतक ओम (ओजस) किन्ह- ोळा गावचे सुपुत्र माजी सैनिक तथा शौर्यचक्र विजेते रमेश बाहेकर यांचा मुलगा होता.
 

SUICIDE 
 
यावर्षी ओमची बारावी होती. यावर्षी त्याने जेईईची परीक्षा दिली होती या परीक्षेत त्याला कमी मार्क आल्याने त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याची आई आणि वडील रमेश बाहेकर है दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेर गेले असतांना छताला रूमाल बांधून जीवन संपवले. ओमच्या दोन्ही बहिणी पुण्याला आहेत. ओम सुध्दा एका दिवसापूर्वी पुण्यावरून परतला होता. जिल्हा सामन्य रुग्णालय बुलढाणा येथे श्वविच्छेदन करण्यात आले
Powered By Sangraha 9.0