नागपूर,
Lokmat wins शालिनीताई मेघे हाॅस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर आणि स्पाेर्ट्स जर्नालिस्ट असाेसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित २५ व्या आंतरप्रेस टी-२० ल काॅलेजच्या वसंतनगर येथील मैदानावर लाेकमतने निर्धारित २० षटकांत ८ बाद १५६ धावा केल्या. देवेंद्र सदावर्तेने (३७), सचिन खडकेने नाबाद (२७), सारंग वलवटकरने (२२) व अमित खाेडकेने (१७) धावा केल्या. राजेश्वर ठाकरेने तीन तर अजिंक्य दलाल व शुभम कथबाटेने प्रत्येकी दाेन गडी बाद केले.

विजयाचा पाठलाग करताना लाेकसत्ता १८.३ षटकांत ९५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. अजिंक्य दलालने (२४), धनंजय खेडकरने (१७), सूरज निंबाळकरने (१६) धावांचे याेगदान दिले. सचिन खडकेने तीन व सचिन तुरकने दाेन गडी टिपले. धनवटे नॅशनल काॅलेजचे क्रीडा विभाग प्रमुख डाॅ. देवेंद्र वानखडे यांच्या हस्ते अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सचिन खडकेला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. Lokmat wins तत्पूर्वी, एसएमएचआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अनूप मरार यांनी क्रिकेट खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. याप्रसंगी जी. एच. रायसाेनी स्पाेर्ट्स अॅण्ड कल्चरल फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख डाॅ. मृणाल नाईक आणि एसएमएचआरसीचे संचालक (मार्केटिंग) अमित दास, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक सुनील मुजूमदार, एसजेएएनचे उपाध्यक्ष अमित संपत, सचिव परिताेष प्रामाणिक उपस्थित हाेते.