पुन्हा एका वाघाचा मृत्यू... हे चाललंय काय?

17 Feb 2025 20:01:47
भंडारा, 
 
 
 
Bhandara-Tiger dead-NTCA जिल्ह्यात वाघ आणि वाघ यांच्या बछड्यांच्या मृत्यूच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज पुन्हा तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी वनक्षेत्र अंतर्गत नर वाघ मृत अवस्थेत आढळून आला. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. Bhandara-Tiger dead-NTCA आठवडाभरात यात परिसरात चार वाघांचे बर्थडे आढळून आले होते. यातील दोघांचा मृत्यू झाला असून, दोन नागपूर येथील गोरेवाडा येथे उपचार घेत आहेत. या घटनेनंतर वनविभागाच्या वन्य प्राण्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आज पुन्हा मृतावस्थेत आढळलेल्या वाघाने यावर शिक्कामोर्तब केला आहे.
 
 
 
 
Bhandara-Tiger dead-NTCA
 
 
 
Bhandara-Tiger dead-NTCA आज 17 रोजी भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा नियतक्षेत्र सीतासावंगी कक्ष क्रमांक 65 राखीव वन येथे वाघ मृत अवस्थेमध्ये असल्याची माहिती गुराख्यामार्फत नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राधिकारी यांना संध्याकाळी 5 वाजता देण्यात आली. Bhandara-Tiger dead-NTCA वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघ हा नर असून त्याचे वय अंदाजे 3-4 वर्षे असल्याचे समजते. वाघाच्या तोंडावर, मानेवर व मागील पायाला जखमा असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. वाघाचे सर्व अवयव कायम असल्याचे समजते.
 
 
 
 
Bhandara-Tiger dead-NTCA राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या प्रमाणभूत कार्यपद्धती (SOP) नुसार गठित समितिद्वारे घटनास्थळ व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या चमूने वाघाचे शवविच्छेदन केले. वाघाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शवविच्छेद नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होइल असे वनविभागाचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मृत्यू दोन वाघांच्या झुंजित झाला असल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. Bhandara-Tiger dead-NTCA या प्रकरणी वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल गवई भंडारा, यांचे मार्गदर्शनात प्रकाष्ठ निष्काशन अधिकारी रितेश भोंगाडे,  नाका डोंगरी वनपरीक्षेत्रअधिकारी अपेक्षा शेंडे करीत आहे.
Powered By Sangraha 9.0