उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मुख्यमंत्री कक्षातंर्गत कार्य करणार

17 Feb 2025 21:32:06
मुंबई, 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून चांगले काम केले. तेच काम पुढे नेण्यासाठी आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली असून, हा कक्ष CM Medical Assistance Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षांतर्गत काम करणार आहे.
 
 
shinde
 
राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी राज्यभरात CM Medical Assistance Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षांची स्थापना देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर केली होती. या निधीच्या माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येते. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी या कक्षाचे काम प्रभावीपणे पुढे नेले. त्याचा फायदाही शदे यांना झाला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत मंत्रालयात उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापन केला होता. या कक्षाच्या माध्यमातून धर्मादाय रुग्णालयात निर्धन रुग्णांना उपचार, राज्यभरात आरोग्य शिबिर भरवणे तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आदी सेवाभावी कामे केली जात होती. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी हा कक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला जोडला. याच पृष्ठभूमीवर एकनाथ शदेंनी फडणवीसांसारखा आपला मदत कक्ष सुरू केला असून, हा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गोरगरीब रुग्णांना महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळावेत या कक्षातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
 
 
CM Medical Assistance Fund मात्र, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना थेट अर्थसाहाय्य वितरित केले जाणार नाही. परंतु, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तसेच धर्मादाय रुग्णालय योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यासह केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा कसा देता येईल, त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार कसे करता येतील, यासाठी समन्वयाची भूमिका पार पाडली जाणार आहे.
 
 
CM Medical Assistance Fund उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला पूरक असा उपक्रम असणार आहे. हा कक्ष उपमुख्यमंत्री कार्यालयाचा एक अंग असून, तो मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या जागेत कार्यरत असेल. आरोग्य विषयक योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्या यासाठी हा कक्ष दुवा म्हणून कामकाज पाहणार आहे. या कक्षाचे संचलन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे तत्कालीन पमुख मंगेश चिवटे हे करणार आहेत.
Powered By Sangraha 9.0