तभा विशेष
- प्रफुल्ल व्यास
वर्धा,
MGAHV Wardha-leftist वर्धेतील महात्मा गांधी आंतर राष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठ स्थापनेपासूनच कायम वादात राहत आले आहे. या विद्यापीठावर डाव्या विचारसरणीचाच कायम पगडा राहत आला आहे. दोन वर्षांपुर्वी कुलपतीचा तडकाफडकी राजिनामा झाल्यानंतर विद्यापीठात इन्कलाब जिंदाबादचे नारे लावण्यात आले होते. दरम्यान, याच विद्यापीठात 24 व 25 फेब्रुवारी रोजी होणार्या राष्ट्रीय चर्चा सत्रात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खुलेआम टीका केलेला आणि त्याच विषयात गुन्हा दाखल झालेल्या चित्रपट दिग्दर्शक अविनाश दास याला निमंत्रित करण्यात आले आहे.
MGAHV Wardha-leftist केंद्र सरकारच्या अख्त्यारीत येत असलेले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासुन प्रभारी कुलपतीच्या भरोश्यावर चालत आहे. याशिवाय कुलसचिव व वित्त अधिकार्याचेही पद प्रभारीच असल्याने येथे अनेक अडचणी येत आहेत. तत्कालीन कुलपती रजनिश कुमार यांनी राजिनामा दिल्यानंतर पुन्हा डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी डोके वर काढले. विद्यापीठात गांधी एवं शांती अध्ययन विभागाचच्या वतीने भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त वतीने ‘सिनेमा, साहित्य और समाज का अन्त:संबंध’ या विषयावर 24 व 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात खुलेआम टीका करणारा हिंदी चित्रपट दिग्दर्शक अविनाश दास याला निमंत्रित करण्यात आले आहे.
MGAHV Wardha-leftist याशिवाय 22 जणांना चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आल्याचा उल्लेख विद्यापीठाच्या अधिकृत निमंत्रित पत्रिकेत आहे. यातील बहुतांश वक्ते डाव्या विचाराचे आहेत, हे उल्लेखनिय! केंद्र सरकारच्या निधीवर होणार्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर टीका करणार्यालाच निमंत्रित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात विद्यापीठाचे कुलपती के. के. सिंग यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला बोलवण्यात आले नाही. आपण रेल्वे प्रवासात असल्याचे सांगुन त्यांनी अन्य प्रश्नांचे उत्तरं देणे टाळून फोन बंद केला.