वर्धा,
Shiv Jayanti वर्धेकरांनी आपले वेगळेपण कायम जपून ठेवले आहे. आहे त्या परिस्थितीला साजेसे काम करण्याची वर्धेला देण आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना त्यात नावीन्यता असतेच. छत्रपतीचा आकर्षक किल्ला उभारताना त्याला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. खालच्या बाजूला तोफ किल्ल्याच्या मागेपुढे तीन सीसी टीव्ही कॅमेरा आणि बाजूला सिग्नल देखील आहे. छत्रपतीच्या काळात या गोष्टी मनुष्य सांभाळत होता आता तंत्रज्ञानचा वापर... वर्धेतील शिवाजी चौक दोन दिवसापासून शिवमय झाला आहे. भगवे झेंडे लक्ष्य वेधून घेत आहेत.

शिवाजी महाराज यांची जयंती उद्या १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. Shiv Jayanti शिव प्रभूंच्या पुतळ्या मागे किल्ल्याचा आकर्षक देखावा याही वर्षी निर्माण करण्यात आला आहे. शिवरायांना माल्यार्पण करताना जणू किल्ल्यावरूनच आपण जात असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रशासकीय अधिकारी व मान्यवर मंडळींच्या हस्ते हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. सकाळी 9.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून निघणाऱ्या रॅली, झाकीचे छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आकर्षक अशी विद्युत रोषणाई येथे करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागे ४० बाय ६० आकारात भव्य अशी किल्ल्याची प्रतिकृती मध्यप्रदेशातून आलेल्या कलाकारांनी साकारली आहे. जयंतीच्या निमित्ताने शिवकालीन शिल्प देखाव्याच्या रूपात निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. जयंतीदिनी शहरातील शिवप्रेमी बालगोपाल व तरुण शिवरायांची वेशभूषा करून कला सादर करतील त्यासोबतच अनेक बालके व तरुण शिवचरित्रावर पोवाडा सादर करणार आहे. या कार्यक्रमाकरिता येथे व्यासपीठ निर्माण केले जाणार आहे. आयोजित कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेत सहकार्य करावे असे, आवाहन शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आले आहे.