अजनी पुनर्विकासाला वेग

19 Feb 2025 21:52:27
- स्थानकाच्या इमारतीचे ७० टक्के काम पूर्ण
- २९७.७९ कोटी विकास कामे
 
नागपूर, 
Ajni Railway Station मध्यवर्ती रेल्वेस्थानकासोबतच आता अजनी स्थानकाच्या पुनर्विकासाला वेग आला आहे. स्थानकाची पूर्व भागात बांधण्यात येत असलेल्या इमारतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम दिलेल्या वेळेत होईल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. स्थानकाच्या पुनर्विकासाकरिता २९७.७९ कोटी खर्च होत असून ४० महिन्यात हे काम पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत २५ महिने पूर्ण झाले असून उर्वरित १५ महिन्यात इतर कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून परिश्रम घेतल्या जात आहे.
 

ajani 

फूट ओव्हरब्रिजचे कामही सुरू
प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज आणि कॉन्कोर्सचे काम ३० टक्के पूर्ण झाले स्टेशन बिल्डिंगचे काम ३० टक्के झाले आहे. इमारतीच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांची सोयीकरिता रेल्वे फलाट आणि फूट ओव्हरब्रिजचे कामही सुरू झाले असून दक्षिण भागात एफओबीचे काम केल्या जात आहे. यासोबतच कनेक्टिव्हिटी सुधारण्यावरही भर दिला जात आहे. पुनर्विकासानंतर अजनी स्थानक प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव मिळणार आहे.
 
स्थानकाचा बदलणार
Ajni Railway Station उत्तर-दक्षिण भागात नव्याने कॉलम बांधकाम केल्या जात आहे. याशिवाय फूट ओव्हरब्रिजसाठी आवश्यक बांधकाम वेगाने हाती घेतले आहे. आतापर्यंत, ४८ पैकी ३२ कॉलमचे काम झाले आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात ही कामे सुरू असल्याने अजनी रेल्वे स्थानकाचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे.
 
प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा
अजनीच्या पुनर्विकासाला गती प्राधान्य क्रम ठरविण्यात आला आहे. प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा मिळावी,यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केल्या जात आहे. स्थानकाच्या पूर्व भागात उभारण्यात येत असलेल्या मुख्य इमारतीचे सुमारे ७० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. ग्राउंडचा भाग आणि ३ इमारतीचे काम सुरु असून यांत्रिक, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग आणि अग्निसुरक्षा संबंधित कामे हाती घेतल्या जाणार आहे. ४ नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुध्दा लवकर तयार होतील.
आधुनिकीकरणाच्या दिशेने योग्य पाऊल
Ajni Railway Station भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाअंतर्गत अजनी स्टेशनच्या परिसरात पुनर्विकास प्रकल्प वेगाने पूर्ण होणार आहे. सर्व बांधकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक संसाधने मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वेच्या बांधकामासंदर्भात सद्यस्थितीत २ निवासी टॉवरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या टॉवर्समध्ये २८ निवासी क्वार्टरचा समावेश आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना आधुनिक आणि आरामदायी निवासी सुविधा येथे उपलब्ध होतील.
Powered By Sangraha 9.0