युक्रेनच्या अध्यक्षांसोबत चर्चा करण्यास तयार

    दिनांक :19-Feb-2025
Total Views |
- पुतिन यांच्या प्रवक्त्याची स्पष्टोक्ती
 
मॉस्को, 
मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या Russia-Ukraine war रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी सौदी अरबची राजधानी रियाध येथे अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो आणि त्यांचे रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्यात नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनच्या अध्यक्षांसोबत चर्चा करण्यास रशिया तयार असल्याची टिप्पणी केली.
 
 
Russia-Ukraine
 
Russia-Ukraine war : पेस्कोव्ह यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सौदी अरबमध्ये झालेल्या चर्चेमुळे व्लादिमिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लवकरच प्रत्यक्ष बैठक होऊ शकते. रशिया युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे.अमेरिका आणि रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी एकत्र बसून शांतता चर्चेची रूपरेषा तयार केली. या बैठकीत युक्रेन युद्ध संपवण्यावर तसेच अमेरिका-रशिया संबंधांमधील अडथळे दूर करण्याबाबत चर्चा झाली. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आमच्या अनुपस्थितीत युद्धबंदीच्या करारास मान्यता देणे आपल्याला मंजूर नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी रशियाच्या धोरणासंदर्भात अचानक बदल केल्यामुळेयुरोपीयन राष्ट्रे आणि नाटोच्या सहयोगी देशांनी चिंता व्यक्त केली आहे.