आयसीसी रँकिंग...बाबरच्या सिंहासनावर बसला भारताचा प्रिन्स!

    दिनांक :19-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली 
Shubman Gill ICC Rankings आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अगदी आधी आयसीसी पुरुष खेळाडूंच्या रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. भारताचा शुभमन गिल आणि श्रीलंकेचा महेश थिकेशना एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. शुभमन गिलने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला मागे टाकत जगातील नंबर १ वनडे फलंदाज बनला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गिलने नंबर १ चे स्थान पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे.
 

Shubman Gill ICC Rankings 
 
गिलने अलिकडेच अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावून हे स्थान मिळवले. तर रोहित शर्मा त्याच्या जागी आहे. तो ८०२ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल दोन स्थानांनी पुढे सरकला आहे आणि श्रीलंकेचा चरिथ असलंका आठ स्थानांनी पुढे सरकला आहे. Shubman Gill ICC Rankings पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवाननेही ६ स्थानांनी प्रगती करत १५ व्या स्थानावर पोहोचला आहे, जो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आझमची जागा शुभमन गिलने घेतली.
 
आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारी
 
  1. भारत शुभमन गिल ७९६
  2. पाकिस्तान बाबर आझम ७७३
  3. भारत रोहित शर्मा ७६१
  4. दक्षिण आफ्रिका हेनरिक क्लासेन ७५६
  5. न्यूझीलंड डॅरिल मिशेल ७४०
  6. भारत विराट कोहली ७२७
  7. आयर्लंड हॅरी टेक्टर ७१३
  8. श्रीलंका चरिथ असलंका ६९४
  9. भारत श्रेयस अय्यर ६७९
  10. वेस्ट इंडिज शाई होप ६७२
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश थिकेशना अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानला मागे टाकत पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर १ गोलंदाज बनला आहे. श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होत नसला तरी, थीकशनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या घरच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. कोलंबोमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या, ज्यामुळे त्याला हे स्थान मिळवता आले. भारताचा कुलदीप यादव एका स्थानाने पुढे सरकला असून तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. Shubman Gill ICC Rankings दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज (सहावा) आणि न्यूझीलंडचा मिशेल सँटनर (सातवा) यांनीही टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या ८ संघांच्या स्पर्धेत या रँकिंगमुळे स्पर्धा अधिक रोमांचक होऊ शकते. या स्पर्धेत गिल आणि बाबर आझम यांच्यात नंबर १ स्थानासाठी स्पर्धा पाहायला मिळेल. रशीद खान देखील थीकशनापेक्षा फक्त ११ रेटिंग पॉइंट्सने मागे आहे आणि स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तो पुन्हा नंबर १ चे स्थान मिळवू शकतो.