दखल
- डॉ. मयंक चतुर्वेदी
'Love Jihad' by Hindu names : मध्य प्रदेशात इस्लाम धर्म मानणार्या मुस्लिमांची लोकसंख्या सहा-सात टक्क्यांपेक्षा जास्त नाही. मात्र, असे असूनही त्यांच्यातील अनेकांचे मूल्य एवढे जास्त आहे की, त्यांना कायदे, नियम याने काहीही फरक पडत नाही, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि इस्लामच्या नावाखाली सर्व काही करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या लोकसंख्येत वाढ होईल. वस्तुस्थिती ही आहे की, जिहादी मानसिकता असलेले आणि इस्लामिक कायदा प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ इच्छिणारे सातत्याने हिंदू नावे करून गैर-मुसलमान युवतींना आपल्या जाळ्यात ओढत आहेत.
हिंदू युवतींना सर्वाधिक लक्ष्य केले जात असल्याचेही समोर आले आहे. राज्यात कुठेही लव्ह जिहादचा गुन्हा दाखल झाला नाही असा एकही महिना उलटत नाही, अशी परिस्थिती आहे. २०२४ च्या जुलैपासून आज फेब्रुवारी २०२५ ची आकडेवारी हेच दर्शविते. राज्यात इंदूरमध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळली आहेत. उघडकीस आलेल्या एका नवीन प्रकरणात १९ वर्षीय विद्यार्थिनी लव्ह जिहादची शिकार झाली आहे. हिंदू विद्यार्थिनीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी मोहम्मद आदिलने देखील हिंदू नाव धारण केले. नंतर हळूहळू मैत्री वाढवली आणि एक दिवस तिला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात घेतल्यानंतर त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी हिंदू मुलीच्या कुटुंबीयांवरही धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव सुरुवात केली.
आदिल खान झाला आदित्य यादव
'Love Jihad' by Hindu names : या प्रकरणात आदिल खानने एका हिंदू विद्यार्थिनीला आपले नाव आदित्य यादव असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मात्र, आता संबंधित विद्यार्थिनीने आणि तिच्या वडिलांनी आदिल खान, त्याचे वडील मोहम्मद झहीर आणि आईविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी स्वत:हून कारवाई करीत भारतीय संहिता २०२३ च्या कलम ३ (५) आणि धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०२१ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याशी संबंधित आहे. आरोपी आदिल खानने आदित्य यादव हे हिंदू नाव धारण करून सतना शहरात वास्तव्यास असलेल्या व बीकॉम करणार्या १९ वर्षीय आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या प्रकरणी तक्रारी झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली. या संदर्भात मुलीच्या वडिलांनी फिर्याद नोंदविली असून, आपली मुलगी कोणासोबत राहते आणि तिचा जास्तीत जास्त वेळ कुणासोबत घालवते, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी मला कळले की मुलगी बराच वेळ एका मुलाशी असते. हा मुलगा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी जेव्हा मुलीकडे चौकशी केली तेव्हा मला कळले की, ती ज्या व्यक्तीशी नेहमी बोलत असते त्याचे पूर्ण नाव आदित्य यादव आहे, असे वडिलांनी तक्रारीत नमूद केले. मात्र, नंतर १५ दिवसांनी घडलेल्या घटनेनंतर सर्वांनाच हादरा बसला. आपण परीक्षा देण्यासाठी कॉलेजमध्ये जात आहोत तिने घरच्यांना सांगितले. तिला कॉलेजमधून घरी आणण्यासाठी चुलत भाऊ तिला परीक्षा केंद्रावर घ्यायला जातो तेव्हा आपली बहीण तेथे नसल्याचे त्याला कळते. चुलत भावाने याबाबत चौकशी केली असता, बहिणीने त्यादिवशी पेपरच दिला नसल्याचे स्पष्ट होते. ती परीक्षा केंद्रावर अवश्य गेली. मात्र, पेपर न देताच दुसरीकडे कुठेतरी निघून गेल्याचे तपासात समोर विद्यार्थिनीच्या चुलत भावाने तिच्या मैत्रिणीकडून याबाबत माहिती घेतली असता, आपल्या बहिणीशी नेहमी बोलणार्या तरुणाचे नाव आदित्य यादव नसून आदिल खान असल्याचे त्याला समजले. खोटे नाव सांगून त्याने हिंदू विद्यार्थिनीची फसवणूक केली. आदिलने लिव्ह इनचे प्रतिज्ञापत्रही विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाठवले होते. हे प्रतिज्ञापत्र नोव्हेंबर २०२३ मध्ये तयार करण्यात आले होते, ज्यात आदिल खानने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहण्याबाबत तिच्याकडून संमती घेऊन संमतीपत्रावर स्वाक्षरी करायला लावली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, यानंतर आदिल खानच्या आईवडिलांनी तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच आदिलचे कुटुंबीय फरार झाले असून पोलिसांनी आदिलला अटक केली आहे.
समीर निघाला आशू खान
२०२४ मध्ये इंदूरमधून एक प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका मुस्लिम तरुणाने आपली खरी ओळख लपवत एका हिंदू तरुणीशी सलगी करून तिचा विश्वास संपादन केला व नंतर तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. खजराना पोलिसांनी संबंधित हिंदू मुलीच्या तक्रारीवरून समीर ऊर्फ आशू खान याच्याविरुद्ध मध्य धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवला.
छिंदवाडा जिल्ह्यात ‘द केरला स्टोरी’
'Love Jihad' by Hindu names : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रावणवाडा शिवपुरी पोलिस स्टेशन परिसरात ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातील कथानकाप्रमाणे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथे प्रथम एका हिंदू युवतीची मुस्लिम तरुणाशी जाणीवपूर्वक ओळख व मैत्री करून देण्यात आली. त्यानंतर तिला धमकावून तिच्याकडून पैसे उकळण्यात येत होते. अखेर या छळाला कंटाळून पीडित युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रावणवाडा शिवपुरी पोलिसांनी याप्रकरणी एका युवतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कादिर, साबीर आणि शबाना खातून अशी त्यांची नावे असून तिघेही पीडित मुलीबरोबर शाळेत शिकत होते.
शबाना खातूनसोबत पीडित मुलीची मैत्री झाली. शबानाने आपल्या हिंदू मैत्रिणीला कादिरचा मोबाईल नंबर दिला आणि तो खूप छान मुलगा असून त्याच्याशी अवश्य मैत्री कर असे तिला सांगितले. त्यानंतर हिंदू युवती आणि कादिरच्या नेहमीच भेटीगाठी व गप्पा होऊ लागल्या. हळूहळू कादिर, साबीर आणि शबाना या तिघांनीही या हिंदू मुलीच्या मनावर आपला पूर्ण ताबा तिला आपल्या तालावर नाचायला लावले. या तिघांसाठी पीडित हिंदू मुलीने पैशांची उधळपट्टी सुरू केली, पण नंतर हे प्रकरण धर्मपरिवर्तन व इस्लाम स्वीकारण्यापर्यंत आले. तू मुस्लिम धर्म स्वीकारला नाही तर तुझ्या वडिलांना आणि भावाला ठार केले जाईल, असे या हिंदू मुलीला सांगण्यात आले. यामुळे खाडकन डोळे उघडलेल्या पीडितेने शिवपुरी पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी कादिर, साबीर आणि शबाना खातून या तिघांविरुद्ध खंडणीच्या कलम ३८६, गुन्हेगारी कटाच्या कलम १२०-बी, जीवे मारण्याची धमकी कलम ५०६, ३४ आणि मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०२१ च्या कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
धर्मपरिवर्तनासाठी मोईन शेखचा दबाव
मे २०२४ मध्ये इंदूरच्या आझादनगर पोलिस परिसरात एका महिलेवर अत्याचार आणि लव्ह जिहादची घटना समोर आली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोईन शेख (रा. कोहिनूर कॉलनी, इंदूर) याच्याविरुद्ध मध्य प्रदेश धर्मस्वातंत्र्य कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, मोईनने तिच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर बलात्कार केल्यानंतर त्याने धर्मपरिवर्तन करून मुस्लिम होण्यासाठी तिच्यावर दबाव सुरुवात केली. त्यानंतर पीडित हिंदू महिलेने मोईन शेखविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अल्फेज खानची युवतीला ठार मारण्याची धमकी
'Love Jihad' by Hindu names : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लव्ह जिहादचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात अल्फेज खान नावाच्या तरुणाने गुजराती महाविद्यालयात शिकणार्या एका हिंदू युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर तिच्यावर धर्मपरिवर्तनासाठी टाकण्यास सुरुवात केली. ‘जर तू धर्मांतर केले तरच मी तुझ्याशी निकाह करीन आणि तुझे आयुष्य ‘सेट’ करून देईन कारण माझ्याजवळ खूप संपत्ती आहे, शेतीवाडी आहे आणि आर्थिकदृष्ट्या आमचे कुटुंब सुदृढ आहे’ असे अल्फेज खानने तिला सांगितले. मात्र, जेव्हा विद्यार्थिनीने धर्मपरिवर्तन करण्याची अट धुडकावून लावली तेव्हा अल्फेजने तिला जीवे मारण्याची दिली.
युवतीच्या जखमांवर टाकले तिखट
एप्रिल २०२४ मध्ये मध्य प्रदेशातील गुणा जिल्ह्यात लव्ह जिहादचे भयानक प्रकरण उघडकीस आले. ज्यात एका मुस्लिम तरुणाने हिंदू युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओडून माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. माणुसकीला काळीमा फासणार्या या लव्ह जिहादच्या या भयंकर घटनेत अयान खान या मुस्लिम तरुणाने पीडित युवतीला महिनाभर ओलीस आणि तिला बेल्ट आणि नळाच्या पाईपने बेदम मारहाण केली. तिच्या जखमांवर मिरची पावडर शिंपडून या विकृत अयान खानने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या. मुलीने वेदनांनी ओरडू व किंचाळू नये म्हणून या मुस्लिम तरुणाने तिच्या तोंडावर फेविक्विक चिकटवले. लव्ह जिहादची बळी ठरलेल्या गुणामधील या पीडित मुलीची प्रकृती इतकी गंभीर झाली होती तिला उपचारांसाठी ग्वाल्हेरला हलवण्यात आले. एवढेच नव्हे तर तिच्या डोळ्यांवरही शस्त्रक्रिया करावी लागली. गुणा पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अयान खानविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले
'Love Jihad' by Hindu names : एप्रिल २०२४ मध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे ‘लव्ह जिहाद’शी संबंधित आणखी एक मोठे प्रकरण समोर होते. लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम युवकाने आपले धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप २७ वर्षीय पीडित तरुणीने केला आहे. यादरम्यान आरोपीने तिला धमकावले, तिच्यावर बलात्कार केला आणि बळजबरीने तिला गोमांस देखील खाऊ घातले. हिंदू जागरण मंचच्या मदतीने पीडित युवतीने या प्रकरणाची तक्रार केली. तारागंज भागात राहणार्या २७ वर्षीय तरुणीने साबीर छोटे खानवर वरील आरोप केले आहेत. साबीरचे वडील युसूफ खान आणि भाऊ समीर खान यांनीही आपल्याला मारहाण केल्याचा आरोप पीडित युवतीने केला आहे. अनेक महिने मुस्लिम तरुण साबीरचे अत्याचार सहन केल्यानंतर पीडित तरुणीने संधी साधून आपले घर गाठले. दरम्यान पीडित युवतीने हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व कहाणी सांगितली. यानंतर सर्वजण बहोडापूर पोलिस ठाण्यात पोहोचले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुण साबीर खानविरुद्ध बलात्कार, मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा २०२१ आणि वडील युसूफ खान आणि भाऊ समीर खान यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला व अन्य कलमांखाली एफआयआर नोंदवला.?
(पांचजन्यवरून साभार)