वॉशिंग्टन,
American FBI Director Kash Patel : भारतीय वंशाचे कश्यप काश पटेल हे अमेरिकन तपास संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक बनले आहेत. अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. मतदानात ते 51-49 अशा अल्प बहुमताने ते या पदावर निवडून आले.
American FBI Director Kash Patel : डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांव्यतिरिक्त दोन रिपब्लिकन खासदार सुसान कॉलिन्स आणि लिसा मुर्कोव्स्की यांनीही पटेल यांच्या विरोधात मतदान केले. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांना भीती आहे की, पदभार स्वीकारल्यानंतर काश पटेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाचे पालन करतील आणि त्यांच्या विरोधकांना लक्ष्य करतील. मंजुरी मिळाल्यानंतर पटेल यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. सिनेटकडून मंजुरी मिळाल्यानंतर पटेल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एफबीआय जगातील प्रत्येक कोपऱ्यात अमेरिकन लोकांना हानी पोहोचवणाऱ्यांचा पाठलाग करेल. माझे हे वक्तव्य एक इशारा म्हणून घ्या.