महाकुंभमेळा खोटा प्रचार करणार्‍यांना चपराक

21 Feb 2025 19:49:00
विश्लेषण
रमेश शर्मा
Prayagraj Mahakumbh Mela : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक भारतात येत आहेत. एवढेच नव्हे तर विद्वान, अभ्यासक, संशोधक मोठ्या संख्येने येत आहेत. देश-विदेशातील प्रसारमाध्यमांमध्ये महाकुंभावर मोठ्या प्रमाणात लिखाण होत आहे. जगभरात महाकुंभाचा महिमा, वैज्ञानिक दृष्टिकोन, अध्यात्म आणि सनातन भारतीय संस्कृतीचे कौतुक होत आहे. एकीकडे हे सगळे असताना दुसरीकडे सनातन अर्थात हिंदूविरोधी शक्ती यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. महाकुंभाबाबत सोशल मीडियावर बेताल वक्तव्ये करीत आहेत, नकारात्मक प्रचार करीत आहेत, व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वस्तुस्थिती ही आहे की मागील सरकारांच्या कार्यकाळात झालेल्या महाकुंभापेक्षा यंदाच्या महाकुंभमेळ्याची व्यवस्था लाखो पटीने चांगली आहे. महाकुंभाबाबत उत्तर सरकारला कोंडीत पकडण्याच्या क्षुद्र राजकीय षडयंत्राचा सातत्याने पर्दाफाश होत आहे. स्वत:ला सेक्युलर समजणार्‍या या हिंदूविरोधी लोकांनी आकाशपातळ एक करूनही भाविकांची श्रद्धा व आस्था कायम असून अधिकच बळकट होत आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या या महाकुंभमेळ्याच्या प्रतिष्ठेला कलंक लावण्यासाठी हिंदू विरोधकांनी, सेक्युलर ढोंगी बगळ्यांनी सर्व स्तरावरून प्रयत्न चालविले आहेत. मात्र, आकाशपाताळ करूनही या खोटारड्या विरोधकांच्या हाती काहीही लागलेले नाही. कितीही प्रयत्न केले तरी श्रद्धा व भक्तीरूपी सागरावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. महाकुंभात स्नान करण्यासाठी हजारो लोक येत आहेत. रोजच वाढणारी भाविकांची ही गर्दी पाहून या हिंदू विरोधी मंडळींचा तोल आणि ताल पार बिघडला असून या खोटारड्या लोकांना भाविकांनी सणसणीत लगावली आहे.
 
 
Kumbhamela-1
 
जगातील प्रत्येक धर्म आणि पंथाची स्वतःची खास अशी परंपरा असते. सर्व धर्मीयांची स्वत:ची प्रार्थनास्थळे, उपासना स्थळे असून ते सर्व आपापल्या स्थळी जातात. यहूदींसाठी (ज्यू) जेरुसलेम हे तीर्थक्षेत्र आहे ज्याला ते हजरत अब्राहमची पवित्र भूमी मानतात. त्यांचे लाखो अनुयायी दरवर्षी तिथे जातात. ख्रिस्ती लोक मेक्सिकोमधील बेसिलिका ऑफ अवर ऑफ ग्वाडालूप, पोर्तुगालमध्ये सँक्चुअरी ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा, फ्रान्समधील सँक्चुअरी अवर लेडी ऑफ लॉर्डेसचे येथे भाविक पूजा, उपासना करण्यासाठी जातात. जगभरातील मुसलमान मक्का-मदिना येथे हज यात्रेसाठी जातात. मात्र यासंदर्भात कोणताही नेता, बुद्धिजीवी, लेखक कधीही भाष्य करत नाही. त्यांना केवळ हिंदूंचे सण, उत्सवच दिसतात.
 
 
Prayagraj Mahakumbh Mela : भारतातही अन्य पंथ आणि धर्मांचे धार्मिक कार्यक्रम आणि मेळावे होत असतात, पण त्यावर कधीही राजकारण होत नाही. परंतु भारतात सनातन हिंदू धर्माचे एकही आयोजन, मेळावा, महोत्सव टीका- टिपणीशिवाय किंवा अडथळ्यांविना पूर्ण होत नाही. हिंदू विरोधी लोक काही ना काही निमित्त शोधतच राहतात. हे फक्त आजच होत आहे असे नाही. सनातन हिंदू धर्म आणि त्याच्या हल्ले होण्याचा मोठा इतिहास आहे. मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यांचा सामूहिक नरसंहार केला. यानंतर इंग्रज आले. त्यांनी देखील हिंदू समाजाला त्यांच्या परंपरांपासून दूर ठेवण्यासाठी खोटे नॅरेटिव्ह, कथा पसरवून संभ्रम निर्माण केला. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण तरीही सनातन हिंदू धर्मावरील वैचारिक हल्ले थांबले नाहीत.
 
 
सध्या भारतात सनातन, हिंदूविरोधी घटना समोर येत आहेत, त्यामध्ये इस्लामी कट्टरतावादी, ख्रिश्चन मिशनरी आणि वामपंथी शक्तींचे संगनमत दिसून येते. भारतातील काही राजकीय पक्ष देखील त्यांच्याच सुरात सूर मिसळताना दिसत आहेत. प्रयागराज महाकुंभमेळ्याबाबत ज्या भ्रामक टिपण्या, कमेंट्स करण्यात येत आहेत, त्यात मध्ये इस्लामी कट्टरतावादी, मिशनरी आणि वामपंथी शक्तींची ही युती स्पष्टपणे दिसून ही तीच युती आहे जी कावड यात्रा, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव इत्यादींवर हल्ला करणार्‍यांच्या बचावासाठी उघडपणे उभी ठाकते. अशाच तथाकथित सेक्युलर लॉबीने अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे महत्त्व, त्याची प्रतिष्ठा यावर आघात करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयागराज महाकुंभासाठीही असेच प्रयत्न सुरू आहेत. आधी महाकुंभावर हल्ला करण्याच्या धमक्या जिहादी, कट्टरवादी गटांकडून देण्यात नंतर कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले गेले.
 
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Prayagraj Mahakumbh Mela : परदेशातूनही हजारो भाविक महाकुंभासाठी प्रयागराजला दाखल झाले आहेत. जे पंधरा लाख भाविक एक महिन्याचा कल्पवास करीत आहेत, त्यात विदेशी नागरिकांची संख्या प्रचंड आहे. महाकुंभातील सनातन समाजातील सामंजस्याचे वातावरण, एकात्मतेचा, समरसतेचा भाव याला नख लावण्याचे प्रयत्न मीडियाच्या माध्यमातून होत आहे. महाकुंभात नियोजन नाही, प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित नाही असा खोटा प्रचार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. उदाहरणार्थ, भक्तांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी इंटरनेट मीडियावर एक स्क्रीन शॉट प्रसारित करण्यात आला. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी देत लिहिण्यात आले होते, ‘आमचे तुम्हाला आव्हान आहे कितीही डोकी उडवावी लागली तरी चालतील पण कुठल्याही परिस्थितीत महाकुंभ होऊ देणार नाही. ‘एक्स’ वर धमकीच्या तक्रारीनंतर बरेली पोलिस सक्रिय झाले.
 
 
प्रेमनगर ठाणे पोलिसांनी ३० वर्षीय मेहनाज नावाच्या तरुणाला अटक केली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी दोन नावे समोर आली आहेत. एक नासर पठाण आणि दुसरा फैज. पोलिस त्यांची देखील करीत आहेत. यानंतर दोन राजकीय व्यक्ती, पहिली भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या नगीनाचे खासदार चंद्रशेखर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभाबाबत बेताल वक्तव्ये केली. चंद्रशेखर म्हणाले, ‘ज्यांनी पाप केले आहे त्यांनी कुंभमेळ्याला जावे’. साहजिकच ही टिप्पणी भारतीय धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या महाकुंभाच्या प्रतिष्ठेवर प्रश्न करणारी आहे. भारतीय धर्मग्रंथांनुसार महाकुंभ हा धार्मिक, आध्यात्मिक, मानसिक आणि सकारात्मक ऊर्जा वाढविणारा कारक आहे. मात्र चंद्रशेखर यांनी याचा संबंध केवळ पाप धुण्याशी जोडून महाकुंभला जाणार्‍या भाविकांवर भाष्य केले.
 
 
समरसता तोडण्याचे कारस्थान
Prayagraj Mahakumbh Mela : महाकुंभातील सामाजिक समरसता, ऐक्य, बंधुत्व सलोखा तोडण्याचे, उद्ध्वस्त करण्याचे कारस्थानही रचले गेले. महाकुंभात सर्वजण एकाच ठिकाणी स्नान कोणी कोणाचीही भाषा, प्रांत, जात, पंथ, त्यांची भाषा, प्रदेश, जात कोणी कोणाला विचारत नाही. हे सामाजिक सौहार्द, समरसता तोडण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक खोट्या कथा, नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘जेव्हा भगवान श्रीराम लंकेहून परतून आपले वडील राजा दशरथ यांचे पिंडदान करण्यासाठी प्रयागराजला पोहोचले, तेव्हा ‘रामाच्या हातून एका ब्राह्मणाचा रावणाचा वध झाला आहे’ असे सांगत तेथील ब्राह्मणांनी पिंडदान करण्यास नकार दिला. त्यानंतर अवध येथील ब्राह्मणांना तेथे बोलावण्यात आले, असे सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिण्यात आले. ही पोस्ट निव्वळ बनावट, खोटी व समाजात विद्वेष पसरवण्याचे कारस्थान होते. आता वस्तुस्थितीकडे नजर टाकू. वाल्मीकि रामायणानुसार, श्रीरामचंद्रांनी चित्रकूटमध्ये भरताकडून वडिलांच्या निधनाची वार्ता मंदाकिनी नदीत त्यांचे पिंडदान केले होते. संपूर्ण वाल्मीकि रामायणात पिंडदानासाठी श्रीरामचंद्र प्रयागराजला गेल्याचे कुठलेही वर्णन नाही. वनवासातून परतल्यानंतर श्रीरामांच्या राज्याभिषेकाला जगभरातील साधू, संत, ऋषी आणि आचार्य उपस्थित होते. अत्याचारी, अहंकारी रावणाला ब्राह्मण संबोधून द्वेष पसरवण्याचे हे दुष्टचक्र नवीन नाही. अशी कटकारस्थाने वेळोवेळी होत आली आहेत. ज्याप्रमाणे करपात्री महाराजांच्या आवाहनानुसार झालेल्या गोरक्षण आंदोलनानंतर, वैदिक काळात गोमांस सेवन होत होते, असे वादग्रस्त विधान करीत त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी तसाच हा प्रकार आहे. १६ जानेवारी रोजी आणखी एक स्क्रीन शॉट पोस्ट करण्यात आला. यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थेवर व्यंग्य आले होते. ‘‘भारत हा मूर्खांचा देश आहे. जिथे सरकार कोट्यवधी रुपये जनतेच्या पिण्याच्या पाण्यावर नाही तर भोंदू आणि पाखंडींच्या स्नानावर खर्च करते’’, असे त्यात म्हटले होते.
 
 
प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियावर महाकुंभाबद्दल नवनवीन वाद निर्माण करूनही महाकुंभला जाणार्‍या भाविकांची संख्या सातत्याने वाढत असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘एसएसपी कार्यालयापासून पांटून पुलापर्यंत कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. ज्या पोलिस अधिकार्‍याला महाकुंभाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळायची आहे त्यांचे कार्यालय बांबू-काठ्यांच्या पलीकडे गेलेले नाही आणि वाहतुकीसाठी २२ पैकी केवळ ९ पांटून पूल झाले आहेत. केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले कुंभस्नान करणार्‍यांची संख्या अतिशयोक्तीपूर्ण सांगण्यात येत आहे. घाट रिकामे पडले आहेत. गेरखपूरहून येणारी ट्रेन रिकामी आली आहे.’
 
 
Prayagraj Mahakumbh Mela : एवढेच नाही तर त्यांनी संगम आणि गंगा नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित असल्याचे सांगून त्यांच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड केल्याचा आरोपही केला. मात्र, सर्वच प्रसार माध्यमांनी सर्व ठिकाणांचे तपशील आणि छायाचित्रे दाखवली आणि लोकांशी संभाषणही दाखवले, यामुळे अखिलेश यादव साफ खोटे बोलत असल्याचे व लोकांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचे सिद्ध झाले. कुंभमेळ्याला आलेले भाविक प्रशासकीय यंत्रणेचे आणि पाण्याच्या स्वच्छतेचे जाहीरपणे कौतुक करताना दिसले. वस्तुस्थिती स्पष्ट झाल्याने बेफाम आरोप करणारे अखिलेश यादव अक्षरश: तोंडावर आपटले. अखिलेश यांनी व्यवस्थेवर जे प्रश्न उपस्थित केले ते सर्व भ्रामक दिशाभूल करणारे असल्याचे दिसून आले.
 
 
गीता प्रेस मांडवाजवळील गॅस सिलेंडरमुळे लागलेल्या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने महाकुंभातील व्यवस्था किती सतर्क असते, हे सिद्ध झाले. घटनेनंतर अवघ्या चार मिनिटांच्या आत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. २२ मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. १०० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि कोणतीही तर दूरच पण कुणी जखमी देखील झाले नाही. याउलट २०१३ मध्ये आयोजित महाकुंभात किती अनागोंदी, अव्यवस्था होती हे दाखवण्यासाठी दोनच उदाहरणे पुरेशी आहेत. संगम आणि गंगेचे पाणी इतके प्रदूषित होते की अनेक विदेशी पाहुण्यांनी स्नानही केले नाही. १० फेब्रुवारी रोजी मुख्य अमावास्या स्नानानंतर रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांचा झाला होता. शेकडो जखमी झाले होते. तेव्हा अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 
 
(पांचजन्यवरून साभार)
Powered By Sangraha 9.0