वणी,
Burglary case शहरातील साधनकरवाडीत ३ चोरांनी १५ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वणीतील सर्वात मोठ्या घरफोडीपैकी ही एक घरफोडी होती. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केलेल्या कारवाईत या घरफोडीचा छडा लागला.
या प्रकरणी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी हे वर्धा जिल्ह्यातील तर आरोपी वरोरा येथील असून तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या अटकेमुळे वणीतील आणखी घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रदीप चिंडालिया विमा कंपनीचे विकास अधिकारी (डेव्हलपमेंट ऑफिसर) होते. ते त्यांच्या कुटुंबियांसह साधनकरवाडी येथे राहतात. २५ जानेवारीला ते कुटुंबीयांसह दक्षिण भारतात देवदर्शनाला गेले सोमवारी, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी केअरटेकर घरी आली असता स्वयंपाकघराचे दार उघडे दिसले. आत बघितले असता घरफोडी झाल्याचे तिच्या लक्षात येताच ही माहिती घरमालकाला सांगितली.
Burglary case चोरांनी लोखंडी व लाकडी कपाटातून सोने, चांदी व नगदी असा एकूण १४ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यात २ लाख रोख, ५ तोळ्याच्या ४ सोन्याच्या बांगड्या (२.५ लाख), २ सोन्याच्या अंगठ्या (५० हजार), ५ तोळ्यांची सोन्याची चैन (२.५ लाख), २ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र (१ लाख), ४ नग कानातील सोन्याची रिंग (५० हजार), सोन्याचा नेकलेस (१ लाख), पाच किलो चांदीच्या विटा (३.७५ लाख) तसेच इतर सोने चांदी असा सुमारे १४ ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला होता. वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (॒) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.