- आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमांचे कुटुंबासह शाही स्नान
प्रयागराज,
CM Himanta Biswa Sarma सनातन हे केवळ भूतकाळाचा वारसा नाही, तर भविष्याचे मार्गदर्शक आहे. महाकुंभमेळ्याला येण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. प्रयागराज येथील महाकुंभात त्यांनी शुक्रवारी कुटुंबासह शाही स्नान केले.
CM Himanta Biswa Sarma : एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये सरमा म्हणाले, मी कुटुंबासह त्रिवेणी संगमावर स्नान केले. महाकुंभातील व्यवस्था पाहून मी भारवून गेलो. ममता बॅनर्जी यांनी एकदा महाकुंभात येऊन भव्य व्यवस्था पाहावी. सर्वांनी लक्षात ठेवाव की, सनातन हे जगाचे भविष्य आहे. महाकुंभमेळ्याला येण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. हिमंता यांनी त्यांची पत्नी रिंकी भुईयान, मुलगा नंदिल, मुलगी सुकन्या यांच्यासह संगमात स्नान केले आणि विधीनुसार पूजा केली. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आज त्रिवेणी संगमात मी घेतलेली डुबकी शब्दात वर्णन करता येणार नाही. हा केवळ नद्यांचा संगम नाही, तर लाखो संतांच्या श्रद्धा, अध्यात्म आणि वारशाचा संगम आहे. महाकुंभ हा मानवाला महादेवाशी जोडणारा एक दिव्य पूल आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत, तोपर्यंत सनातन धर्म अस्तित्वात राहील.