भाजपा विकासकामामुळे देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला : चंद्रशेखर
दिनांक :22-Feb-2025
Total Views |
उमरखेड,
Chandrashekhar Bawankule : काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना फक्त प्रलोभने देत सत्ता भोगण्याचे काम केले. म्हणूनच काँग्रेस पक्ष पूर्णतः देशात आणि राज्यात संपुष्टात आला. तर सत्तेत आल्यावर भाजपा करत असलेल्या विकासकामामुळे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते उमरखेड येथे शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा’ कार्यक्रमात कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
या सोहळ्याला आमदार किसन वानखेडे, माजी आमदार उत्तम इंगळे, नामदेव ससाने, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, आमदार संजय कुटे, सुपारे, माजी जिप अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, रमेश चव्हाण, बालाजी उदावंत, कृष्णा देवसरकर, जगदीश नरवाडे, साहेबराव कदम, दीपक आडे, सुदर्शन रावते, महेश काळेश्वरकर, शैलेश मुंगे, किशोर वानखेडे, गायत्री ठाकूर, अॅड. जितेंद्र पवार यांची उपस्थिती होती.
Chandrashekhar Bawankule : देशात भाजपाची सत्ता आली तेव्हापासून सर्वसामान्य घटकातील प्रत्येकाला न्याय व हक्क मिळू लागला आहे. अमेरिकेसारखे राष्ट्र आज भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे नाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीचे मोठे पाऊल समोर येताना दिसत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील पात्र लाडक्या बहिनींना राज्यात सरकार कायम असेपर्यंत लाभ देणार आहे. यात शंका बाळगण्याची मुळीच गरज नाही. पंतप्रधानांनी राज्यातील २० लाख गरजवंतांना घरकुल दिले. प्रथम हप्ता शनिवारी देण्यात आला. सोबतच उमरखेड विधान सभेअंतर्गंत १४ हजार घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्ता रक्कम तांत्रिक पद्धतीने बटन दाबून प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून म्हणून भारतीय जनता पार्टी समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात होणार्या जिप, पंस, नगर परिषद आणि ग्रामपंचायती भाजपाकडे आलेल्या उमरखेड विधानसभेतून माजी आमदार प्रकाश देवसरकर आणि विजय खडसे यांच्यासोबत शेकडो आजी-माजी सहकारातील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व प्रवेश केलेल्यांना सन्मानाची वागणूक निश्चितच मिळेल यात शंका नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.