१५ वर्षांच्या नागा साधूने वेधले भाविकांचे लक्ष

    दिनांक :22-Feb-2025
Total Views |
- कोवळ्या वयात करतो दररोज 12 तास ध्यान
 
प्रयागराज, 
महाकुंभात 15 वर्षांचा मुलगा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संऩ्यास घेण्याचा त्याचा हट्ट आणि कुटुंबाने दिलेल्या परवानगीनंतर हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी असलेला मुलगा Dakshagiri Maharaj दक्षगिरी महाराज बनला आहे. इतक्या लहान वयात तो दररोज 12 तास ध्यान करतो. त्याने महाकुंभात येणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
 
 
MAHARAJ
 
Dakshagiri Maharaj : त्याचे गुरू नागा साधू अजय गिरी महाराज यांनी सांगितले की, पाच वर्षांचा असताना दक्षगिरीच्या वडिलाचे निधन झाले. त्याने त्याच्या आईकडे संऩ्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. आईनेही त्याला साथ दिली. यानंतर घर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पुढील प्रवास निरंजनी आखाड्यातून सुरू झाला. आता त्याच्या प्रवासाला 10 वर्षे झाली, तो धर्माचे रक्षण करण्यासाठी स्वतःला तयार करीत आहे. दक्षगिरीच्या घरची परिस्थिती बेताची होती. मुलाचे संगोपन करण्याची क्षमता त्याच्या आईची नव्हती. मुलाने सनातनसाठी कार्य करावे, अशी तिची इच्छा होती. दशराज बालपणापासून पूजापाठ करायचा. त्याने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आई त्याला आखाड्यात घेऊन आली. त्याची इच्छा पाहून आम्ही त्याला आखाड्यात ठेवण्यास परवानगी दिली.
शस्त्रे, शास्त्रांचे दिले ज्ञान
अजय गिरी महाराज यांनी सांगितले की, पालकांच्या परवानगीने मुलांना आखाड्यात राहण्यास परवानगी दिली जाते. मुलांना आखाड्यांमध्ये आणि पीठांमध्ये सनातन ज्ञान आणि धर्माचे ज्ञान दिले जाते. त्यांना शस्त्रे आणि शास्त्रांचे ज्ञान दिले जाते. जेव्हा ते त्यांच्या कामात पूर्णपणे प्रवीण होतात, तेव्हा त्यांच्याकडे सनातनचा प्रसार करण्याची जबाबदारी दिली जाते. छोट्या नागांसाठी त्यांचे गुरुच सर्वकाही आहेत.