पूर्व-मध्यच्या 71 स्थानकांवर ‌‘कवच‌’ लावण्यासाठी निविदा

    दिनांक :22-Feb-2025
Total Views |
 
नवी दिल्ली, 
Danapur-Sonepur railway : पूर्व-मध्य रेल्वेच्या दानापूर-सोनपूर विभागातील 502 किमी मार्गावरील 71 रेल्वेस्थानकांवर कवच यंत्रणा लावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाची सार्वजनिक कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ने निविदा जारी केली, अशी माहिती कंपनीने शनिवारी निवेदनात दिली. ही महत्त्वपूर्ण कामगिरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रेल्वे सुरक्षा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेलटेलची वचनबद्धता अधोरेखित करते. महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक असलेल्या जवळपास 288 कोटी रुपयांची कवचची ही निविदा आहे. ही रेलटेलच्या सर्वांत मोठ्या सिग्नलिंग प्रकल्पांपैकी एक आहे.
 

danapur 
 
Danapur-Sonepur railway : या प्रणालीची अंमलबजावणी केल्याने सुरक्षितता वाढेल आणि मध्य-पूर्वेतील रेल्वेची कार्यक्षमतेत सुधारणा होईल, असे निवेदनात म्हटले आहे. कवच ही स्वदेशी स्वयंचलित रेल्वे सुरक्षा यंत्रणा आहे. ही दोन रेल्वे गाड्यांमधील धडक टाळण्यासाठी असून, चालक ब्रेक दाबण्यात अपयशी ठरतो, त्यावेळी ही यंत्रणा ब्रेक लावते. रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरक्षितपणे करण्यासाठी ही यंत्रणा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही यंत्रणा लाल सिग्नल ओलांडणे आणि दोन गाड्यांमधील धडक टाळू शकते. ही अत्याधुनिक यंत्रणा पूर्व-मध्य रेल्वेत लावली जाईल. यात मोठ्या प्रमाणातील रेल्वे नेटवर्कचा समावेश आहे. यामुळे लाखो प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल.