गडचिरोली,
Dr. Namdev Kirsan गडचिरोली येथे नवीन विमानतळ प्रस्तावित असून त्याकरीता गडचिरोली, मुरखळा, मुडझा, पुलखल, कनेरी या शेत शिवारातील जमिनीचा सर्वे करण्यात आला आहे. शेतकर्यांच्या सुपीक जमिनीचे भुसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने शेतकर्यांकडून याकरीता विरोध होत आहे. त्यामुळे विमानतळाकरिता सुपीक शेतजमीन अधिग्रहीत न करता पर्यायी जागा शोधण्याकरिता खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रामध्ये गडचिरोली तालुक्यातील शेतकर्यांना शेतीव्यतिरिक्त दुसरा कोणताही मोठा व्यवसाय नाही, तसेच मुरखळा, मुडझा, पुलखल, कनेरी येथील शेतकरी हे अल्पभूधारक असून त्यांना उदरनिर्वाहाकरिता शेतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सदर गावातील शेतकर्यांची शेतजमीन विमानतळाकरिता भुसंपादित करण्यास विरोध दर्शवित असून या परिसरातील शेतमालाची वाढ होऊन त्यांना सुजलाम-सुफलाम बनविण्याच्या हेतुने कोटगल उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण होत आहे. Dr. Namdev Kirsan अशा परीस्थितीत लाभ क्षेत्रातील सुपीक जमीन विमानतळ निर्मितीसाठी भुसंपादित केल्यास कोटगल उपसा सिंचन योजनेचा उपयोग होणार नाही, असे डॉ. किरसान यांनी म्हटले आहे.
गडचिरोली येथील विमानतळाकरिता सदर गावातील गोरगरीब जनतेचे उपजीविकेचे साधन नष्ट होणार नाही तसेच विमानतळाच्या बांधकामाकरिता कोणत्याही ग्रामसभेकडून विरोध सुद्धा होणार नाही यादृष्टीने वरील गावातील शेतकर्यांची सुपीक जमीन भुसंपादित न करता गडचिरोलीतील शासकीय विज्ञान Dr. Namdev Kirsan महाविद्यालयाजवळील झुडपी जंगल स्वरुपात उपलब्ध असलेली वन विभागाची शासकीय जमीन विमानतळ व वसाहतीकरिता शासनस्तरावरून मंजुरीची कार्यवाही करावी, असे खासदार डॉ. किरसान यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे.