नवी दिल्ली
Gadge Maharaj स्वछ्तेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज यांची आज 23 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव येथे झाला होता. डेबूजी झिंगारजी जानोरकर असे त्यांचे नाव होते. भुकेलेल्या अन्न द्या. तहानलेल्या पाणी द्या. वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या. गरीब मुलांना शिक्षणात मदत करा. प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या. बेघर असलेल्यांना आसरा द्या. अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा. बेरोजगारांना रोजगार द्या. पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या. गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा. दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या. हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती आहे. मोलाचा संदेश त्यांनी दिला
गाडगे महाराजांचा पहिला प्रहार मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप कोणाला मानायचे असेल तर ते संत गाडगे होते. गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव गावात एका धोबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होते. गाडगे बाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेलं. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासुन तयार केलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा.
स्वत: पासून Gadge Maharaj केली सुरुवात : गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासुन तयार केलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा. गागडे महाराज जरी गोपालाचे भजन करीत असले तरी, ते माणसात देव शोधणारे होते. ते नेहमी सांगायचे,अंद्धश्रद्धेला बळी पडू नका, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते.
गावात प्रवेश करताच साफसफाई सुरू
गाडगेबाबा कोणत्याही गावात गेल्यावर लगेचच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायचे. त्यांचे काम संपले की ते स्वतः गावातील स्वच्छतेबद्दल लोकांचे अभिनंदन करायचे. गावातील लोकं गाडगे बाबांना जे पैसे द्यायचे त्या पैशांचा नि:स्वार्थपणे सामाजिक विकास आणि समाजाच्या भौतिक विकासासाठी वापर करत असत. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोशाळा, शाळा, रुग्णालये आणि वसतिगृहे बांधली. भिक मागून त्यांनी हे सर्व उभारले. पण, या महापुरुषाने आयुष्यभर स्वत:साठी झोपडीही बांधली नाही. त्यांनी आपलं सर्व आयुष्य धर्मशाळांच्या व्हरांड्यावर किंवा जवळपासच्या झाडांखाली घालवले
अंद्धश्रद्धेला बळी पडू नका
गागडे महाराज Gadge Maharaj जरी गोपालाचे भजन करीत असले तरी ते माणसात देव शोधणारे होते. ते नेहमी सांगायचे, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करायचे. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’असे ते म्हणायचे. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. पण आजही त्यांचे विचार आणि आदर्श प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत.