हदगाव,
Hadgaon Murder case : हदगाव शहरातील खुदबई नगर जिनिंग जवळ येथे २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. शेख अराफात शेख मेहमूद (वय २१ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. हदगाव शहरातील खुदबई नगर येथे दोन दिवसांपूर्वी मृतकास मुलीपासून दूर राहा अन्यथा तुला जीव मारतो अशी धमकी दिली होती. २१ फेब्रुवारी शेख अराफत आपल्या घराजवळील लाकडावर बसला असता आरोपी राम्या संभा काळे, पम्या संभा काळे, साहेबराव काळे, कृष्णा काळे, संजय खानजोडे, प्रदीप पंडित, सीमा काळे, वंदना काळे, जिजाबाई मस्के, प्रियंका काळे, वत्सला काळे, ओमकार काळे यांनी मारहाण सुरुवात केली. त्यानंतर रम्या, पम्या, साहेबराव काळे, कृष्णा काळे, संजय खानजोडे यांनी जवळच्या चाकू काढून वार केले.
जखमी अवस्थेत शेख अराफात शेख मेहमूद यास उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे नेण्यात आले. परंतु पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुबीना शेख मेहमूद यांनी दिलेल्या पोलिसांनी ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), १०३(१) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत एकूण पंधरा आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दहा आरोपींना अटक केली असून पाच जण फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यात यात सात पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. या घटनेचा पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Hadgaon Murder case : घटनेनंतर मृतक व आरोपीचे घर जवळ असल्याने तिथे अचानक दगडफेक चालू झाली. या घटनेचे वृत्तांकन करताना एका पत्रकारास जबर मार लागला. घटनेच्या पृष्ठभूमिवर भोकर, तामसा, मनाठा, हिमायतनगर, नांदेड येथून अतिरिक्त पोलिस कुमक बोलविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी मळधने कोणताही अनुचित घडू नये यासाठी शहरात तळ ठोकून होते.