कृषी अधिकार्‍यांनी बनवली बॅटरीवर धावणारी चारचाकी

22 Feb 2025 20:16:23
- अखंड परिश्रम व बुद्धीचातुर्याने यश

राळेगाव, 
राळेगाव कृषी विभागात मंडळ अधिकारी असलेले Raju Takasande राजू ताकसांडे यांनी बॅटरी चार्जिंगवर धावणारी चारचाकी गाडी तयार केली. ताकसांडे यांनी अखंड परिश्रम व बुद्धीचातुर्याने हे यश मिळवले. राजू ताकसांडे राज्यशास्त्र विषयात पदवीधर असून कृषी खात्यात कार्यरत आहे. मेकॅनिकल विभागात आवड असून लहानपणापासूनच खटपट करणार्‍या स्वभावामुळे.
 
 
Raju Taksande
 
Raju Takasande : त्यांनी आयटीआय डिप्लोमा, डिग्री इंजीनियरिंग असे कोणतेही शिक्षण नसताना केवळ आवड म्हणून ही गाडी बनवली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. हे वाहन तयार करण्यासाठी त्यांना २ लाख १० हजार रुपये खर्च आला आहे. या कामी त्यांनी लागणारी स्वतः घरी तयार केली असून तिची मोटार क्षमता १५ वॅट असून गाडीला रिक्षाचे टायर बसवले आहेत. ही गाडी ८०० किलो वजनाची वाहतूक करते. एकदा चार्जिंग केल्यावर ११० किमी अंतर चालून जाते. ही गाडी पूर्ण चार्ज होण्यास ४ तास वेळ लागत असून त्यासाठी फक्त ४ युनिट विजेची गरज लागते. अशी केवळ छंद म्हणून तयार केली आहे. भविष्यात संधी मिळाल्यास असे काहीतरी अजून मोठे करण्याची इच्छा असल्याचे ताकसांडे यांनी बोलून दाखवली.
Powered By Sangraha 9.0