आपल्या देशातील मातीचा सुगंध म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद : दयाशंकर तिवारी

Baljagat-Nagpur-Hindutva रंगमंच खुला करून निधी उभारणार

    दिनांक :23-Feb-2025
Total Views |
सुमतीताई सुकळीकर स्मृती दिन
 
 नागपूर,
  
Baljagat-Nagpur-Hindutva या देशातील मातीचा सुगंध म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद असल्याचे प्रतिपादन माजी महापाैर दयाशंकर तिवारी यांनी केले. दीनदयाल शाेध संस्थानर्ते सुमतीताई सुकळीकर यांचा स्मृती दिन शनिवारी सायंकाळी लक्ष्मीनगरातील बालजगतमध्ये आयाेजित करण्यात आला हाेता. Baljagat-Nagpur-Hindutva संस्थेच्या अध्यक्ष तसेच कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्या. मीरा खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी सचिव जगदीश सुकळीकर, वर्तमान सचिव प्रशांत देशपांडे व्यासपीठावर उपस्थित हाेते. ‘दीनदयालजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हा विषय दयाशंकर तिवारी यांनी मांडला.
 
 
 
Baljagat-Nagpur-Hindutva
 
 
Baljagat-Nagpur-Hindutva सुमतीताई सुकळीकर यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. पं. दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानववाद या शब्दांना सांस्कृतिक राष्ट्रवाद जाेडून अ.भा. जनसंघाची स्थापना केली. संस्कृती हे राष्ट्र कशी हाेऊ शकते, असा प्रश्न निर्माण हाेताेच. लाॅर्ड मेकाॅलेने त्याच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात म्हटले हाेते की, जाेपर्यंत संस्कृती व संस्काराचे शिक्षण विद्यालयात दिले जाते ताेपर्यंत हिंदुस्थानवर राज्य करणे, ताेडणे संभव नाही. त्याने नवी शिक्षण पद्धती आणून भारताला गुलाम केले. राष्ट्र हे संस्कृतीची पुंजी आहे. राष्ट्रवाद संस्कृतीशी जुळलेली मिमांसा आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद केवळ भारतातच जुळला आहे.
 
 
 
Baljagat-Nagpur-Hindutva पूजेच्या तबकातील सामुग्रीत (सुपारी, कुंकू, पान, हळद, चंदन) चारही दिशांचे प्रतिनिधित्व हाेते व आरती ही अखंड भारताची हाेते. सांस्कृतिक राष्ट्रवाद हाच आहे. हिंदुत्व ही आपली संस्कृती, हाच राष्ट्रवाद आहे. हिंदुत्व धर्मविशेष नसून या राष्ट्राची अशी विचारधारा आहे की जी नित्यनूतन, सनातन हाेते, हे हिंदुत्व आहे, असा विचार दीनदयालजींनी मांडला, असे तिवारी म्हणाले. वर्षा कपले यांनी गीत व पसायदान सादर केले. संचालन विवेक तरासे, आभार प्रदर्शन प्रशांत देशपांडे यांनी केले.
 
रंगमंच खुला करून निधी उभारणार !Baljagat-Nagpur-Hindutva
मीरा खडक्कार म्हणाल्या की, सुमतीताई व आपण ज्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारे काम करताे आहे त्या दीनदयालजींच्या अंत्याेदयाचा विचार करता समाजातील सेवा वस्तीमधील मुलांना येथे आणून संस्कार, प्रगती करायची. येथील जलतरण तलाव लहान मुलांसाेबतच सर्वांसाठी माफक शुल्कावर सुरू करायचा, रंगमंच खुला करून निधी उभारला जाणार आहे.