नागपूर,
Hanuman Temple Ramnagar शनिवारी रामनगर चौकातील पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात सकाळपासून भक्तांची रीघ लागली असते.नवी कार किंवा दुचाकी नवीन घेतली की ,त्या वाहनांची पूजा मंदिरात सांग्रसंगीत पूजा करून त्याचे आशिर्वाद घेतले जातात. वाहन चालवितांना कोणतेही संकट,अपघात नको अशी प्रार्थना करतात.
एक सज्जन गृहस्थ, परिवाराबरोबर कार पूजा करून घ्यायला आले होते. कार जुनी दिसली तर त्यांनी सेकंड हॅन्ड घेतली असेल असे वाटून गुरुजींना कारची पूजा करण्यास सांगितले.ते गृहस्थ बरेच भावुक झालेले दिसत होते. नंतर कळले काही दिवसांपूर्वी त्यांच्या याच कारचा भीषण अपघात झाला होता,Hanuman Temple Ramnagar कारची भयानक अवस्था पाहून आतमधील कोणीही जिवीत राहणे अशक्य वाटले असते. त्यांच्या समोरच अपघात होऊन पाच जण मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी पहिले होते.कारला चार लाख खर्चून (म्हणजे अपघात किती भयानक असेल) त्यांनी वर्धा रोडवरून पूजेकरता व हनुमानाचा आशीर्वाद घेण्याकरता आणले होते.केवळ पश्चिमेश्वर हनुमानाच्या कृपेने कोणाला साधे खरचटलेही नाही हे सांगतांना ते पूर्ण कुटुंब भावविभोर झाले होते.
खरेच देव तारी त्याला कोण मारी.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र