अमेरिकेचा ठसा, वाढीचा वसा

    दिनांक :23-Feb-2025
Total Views |
अर्थचक्र
- महेश देशपांडे
India's business economy : सध्या एकूणच अर्थनगरीवर अमेरिका व्यापून राहिली आहे. इथले गुंतवणूकदार, या देशाकडून लादले जात असलेले शुल्क या देशाशी मोदींनी केलेल्या वाटाघाटी याचीच चर्चा अर्थविश्वात सुरू आहे. किंबहुना, अमेरिकेने चीनवर निर्बंध लादल्याचा भारताला कसा फटका बसतो एकूणच टेरिफ वॉरचा भारत, चीन आणि थायलंडवर कसा परिणाम होत आहे याबद्दल मनोगते समोर येत आहेत. त्याच वेळी सोने एक लाख रुपया तोळे दराकडे वाटचाल करत असल्याची आणि भारत आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था वेगाने वाढणार असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिलेल्या धक्क्याचा फटका भारताच्या क्षेत्राला बसला. ट्रम्प यांनी चीनला धडा शिकवण्यासाठी स्टीलवर २५ टक्के दर लावण्याची घोषणा केली. हा दर १२ मार्चपासून लागू होणार आहे. या निर्णयानंतर जगभरातील बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या धमकीचा सर्वात मोठा परिणाम धातू क्षेत्रातील शेअर्सवर दिसून येत आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनंतर त्याच्या अंमलबजावणीची तारीखही जाहीर करण्यात त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा मेटल निर्देशांक २.२३ टक्क्यांनी घसरला. हा निर्देशांक ६२७.८१ अंकांनी घसरून २७,५२६.०८ अंकांवर बंद झाला. हा इंडेक्स सुमारे सहा टक्क्यांनी घसरला. हिंदुस्थान झिंक, जेएसएल, नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी, एनएमडीसी, कोल इंडिया, वेदांत लिमिटेड, टाटा स्टील, अ‍ॅपल पोलो, जिंदाल स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण मिळाली. भारत हा अमेरिकेचा अव्वल पोलाद निर्यातदार देश नाही. अमेरिका बहुतेक स्टील कॅनडा, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाममधून आयात करते.
 
 
america
 
भारताच्या व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे की, २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत भारताच्या अमेरिकेतील निर्यातीत लक्षणीय घट होत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने २०२२-२३ च्या तुलनेत स्टीलची ४७.६८ टक्के कमी निर्यात केली आहे, तर लोखंड आणि पोलाद वस्तूंच्या निर्यातीतही नऊ टक्क्यांनी घट झाली आहे. ही घसरण या आर्थिक वर्षातही कायम आहे. असे असूनही अमेरिकेने पोलादावर लादलेल्या शुल्काबाबत पोलाद कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे; पण भारताप्रमाणे तोदेखील अमेरिकेच्या स्टील आयातदारांच्या यादीत नाही. चीनकडून स्टील इतर देशांमध्ये पाठवले जाते आणि तेथून अमेरिकेत जाते. ट्रम्प प्रशासनाला माहीत आहे की, स्टीलवर शुल्क लादले गेले तर त्याचा थेट परिणाम चीनवर होईल. भारतीय पोलाद क्षेत्र दीर्घकालीन मजबूत असले, तरी अल्पकालीन तोटा टाळणे कठीण दिसते आणि पुढील उतार-चढावाची जोखीम कायम आहे. भू-राजकीय अनिश्चितता आर्थिक धोरणांमधील बदल बाजाराच्या ट्रेंडवर प्रभाव टाकत राहतील.
 
 
India's business economy : ताज्या ‘टॅरिफ वॉर’चा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. भारत, चीन आणि थायलंडसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांना त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. ‘नोमुरा’ या ब्रोकरेज फर्मने दिलेल्या अहवालानुसार या देशांचे प्रभावी ‘टॅरिफ’ दर अमेरिकेपेक्षा खूप जास्त आहेत. त्यामुळे ते अधिक प्रभावित होऊ शकतात. भारताला होणार्‍या निर्यातीचा सरासरी दर ९.५ टक्के आहे. भारतातर्फे अमेरिकेला होणार्‍या निर्यातीवर तीन टक्के शुल्क आहे. थायलंडमध्ये ०.९ टक्के विरुद्ध ६.२ टक्के तर चीनमध्ये २.९ टक्के विरुद्ध ७.१ टक्के अशी आकडेवारी आहे. अमेरिकेसोबत मुक्त व्यापार करार करणारे सिंगापूर आणि दक्षिण कोरियासारखे देश ट्रम्पच्या प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीपासून अधिक संरक्षित आहेत. ‘नोमुरा’ने आहे की, भारताचा निर्यात शुल्क दर सर्वोच्च आहे. आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये भारत हा सर्वाधिक ‘टॅरिफ’ दर असलेला देश आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफ दरातील वाढीचा भारताला मोठा धोका आहे. जगभरातील भारताच्या निर्यातीपैकी १८ टक्के (आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत सुमारे २.२ टक्के) निर्यात अमेरिकेला होते. २०२४ मध्ये सुमारे ३८ अब्ज इतका अधिशेष वाढला आहे. भारताच्या अमेरिकेला होणार्‍या निर्यातीत इलेक्ट्रिकल/औद्योगिक यंत्रसामग्री, रत्ने आणि दागिने, औषधी, इंधन, लोखंड आणि पोलाद, कापड, वाहने, वस्त्रे आणि रसायने यांचा समावेश होतो. यांपैकी लोह, पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमचा वाटा एकूण ५.५ टक्के आहे, असे ‘नोमुरा’मधील विश्लेषकांनी सांगितले.
 
 
आता या बातम्यांशी विसंगत अशी वेगळी बातमी. जागतिक नाणेनिधीच्या ताज्या २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल पाहायला मिळतील. अमेरिका आपले अव्वल स्थान कायम ठेवेल, तर भारत आणि ब्राझील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्था असतील. या दोन देशांचा जीडीपी वाढीचा दर गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वोच्च आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढला आहे; पण कर्जाचा बोजाही झपाट्याने वाढला आहे. दुसरीकडे कॅनडा, जर्मनी आणि कर्ज कमी करण्यात यश मिळविले आहे. त्याच वेळी जपानच्या अर्थव्यवस्थेत घसरण नोंदविली गेली आहे. त्यामुळे जपानची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक राहिली आहे. हे विश्लेषण २०२० ते २०२५ दरम्यानच्या आर्थिक डेटावर आधारित आहे. जागतिक नाणेनिधीच्या अंदाजानुसार अमेरिकेचा जीडीपी २०२५ मध्ये ३०.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. २०२० मध्ये तो २१.४ ट्रिलियन डॉलर होता. पाच वर्षामध्ये त्यात ४२ टक्क्यांची वाढ आहे. याशिवाय अमेरिकेने कर्ज-जीडीपी गुणोत्तर १३२ टक्क्यांवरून १२४ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. यातून अमेरिकेची मजबूत आर्थिक स्थिती दिसते. चीनचा जीडीपी २०२५ पर्यंत १९.५ ट्रिलियन डॉलर असण्याचा अंदाज आहे. तो २०२० मध्ये १४.९ ट्रिलियन डॉलर होता. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यात ३१ टक्के वाढ झाली परंतु चीनचे कर्ज-जीडीपी प्रमाण ७० टक्क्यांवरून ९४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, चीनचा विकास दर कर्जावर अवलंबून आहे, जो दीर्घकाळासाठी धोकादायक ठरू शकतो.
 
 
India's business economy : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारताचा जीडीपी २०२० मध्ये २.७ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अर्थ भारताने पाच वर्षामध्ये ६० टक्क्यांची प्रभावी वाढ साधली आहे. तसेच, कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर ८८ टक्क्यांवरून ८३ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. हे भारताची आर्थिक स्थिरता दर्शवते. युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीचा जीडीपी २०२० मध्ये ३.९ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये ४.९ ट्रिलियन डॉलर राहण्याचा अंदाज आहे. शिवाय कर्ज ते जीडीपी गुणोत्तर टक्क्यांवरून ६२ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ब्राझीलची अर्थव्यवस्था वेग घेत आहे. ब्राझीलचा जीडीपी २०२० मध्ये १.५ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये २.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ही वाढ पाच वर्षांमध्ये ५६ टक्के असेल. ब्राझीलने कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर ९६ टक्क्यांवरून ९२ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. जीडीपी २०२० मधील २.७ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये ३.७ ट्रिलियन डॉलर होण्याची अपेक्षा आहे. त्यात पाच वर्षात ३८ टक्क्यांची वाढ होणार असली, तरी कर्ज-जीडीपी गुणोत्तर १०६ टक्क्यांवरून १०४ टक्क्यांपर्यंत घसरले. फ्रान्समध्ये जीडीपी २०२५ मध्ये ३.३ ट्रिलियन डॉलर होईल. २०२० मध्ये तो २.६ ट्रिलियन डॉलर होता. त्यात २४ टक्क्यांची वाढ येथिल कर्ज-जीडीपी गुणोत्तर ११५ टक्क्यांवर स्थिर आहे. सोने रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. ११ फेब्रुवारी रोजी सोन्याची फ्युचर्स किंमत ८६ हजारांच्या आसपास होती. आता १० ग्रॅम सोन्याची किंमत ९० हजार रुपये प्रतितोळा होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक अहवालांमध्ये सोन्याचा भाव ९० हजार रुपये प्रतितोळा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. भारतात सोन्याला सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे. बाजारातील परिस्थिती सतत बदलत राहते आणि गुंतवणूकदार आणि व्यापारी या बदलांवर लक्ष ठेवतात. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यामुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने सोने महाग होत आहे. वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीलाही आधार मिळत आहे. शेअर बाजारातील वाढत्या चढउतारांमुळे सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत.
 
(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)