साप्ताहिक राशिभविष्य

23 Feb 2025 06:00:00
 साप्ताहिक राशिभविष्य 
 

Saptahik Rashibhavishy 
 
मेष (Aries Zodiac) : आनंद व समाधानाचे वातावरण
Weekly Horoscope : या आठवड्यात राशिस्वामी पराक्रम स्थानात असतानाच चंद्राचे भ्रमण आपल्या भाग्य स्थानातून प्रारंभ होत आहे, त्यामुळे चंद्र-मंगळाचा समसप्तक योग होणार आहे. त्याच्या प्रभावाने आपल्याकडून काही धडाडीची कामे या सप्ताहात पूर्ण होऊ शकतील. विशेषतः कार्यक्षेत्रात आपल्या कामाची दिसून येईल. काही धाडसाची पावले आपण या आठवड्यात उचलाल. धनस्थानातील गुरूमुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. त्याचे दीर्घकाळ उत्तम लाभ आपणास प्राप्त होत राहतील. कुटुंबातूनही आपल्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळेल. प्रवासाच्या योजना संभवतात.
शुभ दिनांक - २३, २५, २६, १.
 
 
 
वृषभ (Taurus Zodiac) : मानसिक संतुलन सांभाळावे
या आठवड्यातही राशिस्वामी शुक्र लाभ स्थानात असून चंद्राचे भ्रमण मात्र अष्टम या पीडादायक व अशुभ मानल्या जाणार्‍या स्थानातून सुरू होत आहे. ही स्थिती मानसिक आरोग्यास किंवा संतुलनाच्या बाबतीत फारशी चांगली नसली, तरी आर्थिक स्थितीला पोषक ठरते. आपली आर्थिक घडी मजबूत होताना दिसेल. विशेषतः व्यवसायात आवक वाढेल. जुनी येणी येऊ शकतील. काही अचानक निर्णयामुळे मोठा आर्थिक व्हावा. काही आकस्मिक घटनांची नोंद होऊ शकेल. कुटुंबात मोठ्या खरेदीचे विचार साकार होऊ शकतात. प्रवासाच्या योजना आखल्या जाऊ शकतात.
शुभ दिनांक - २५, २६, २७, २८.
 
 
मिथुन (Gemini Zodiac) : जबाबदारीच्या कामांमध्ये कस
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या राशीच्या सप्तम स्थानातून प्रारंभ होत आहे. राशीत मंगळ बसला आहे तर राशिस्वामी बुध रवी शनीच्या संगतीने भाग्यस्थानातून संमिश्र योग निर्माण करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत काही विस्कळीतपणा असेल तरी तो या काळात सुगठित व्हावयास हवा. आपल्याला कार्यक्षेत्रात महत्त्व प्राप्त होत असल्याचे अनुभवास यावे. त्यामुळे कदाचित नोकरी-व्यवसायात आपली व्यग्रतादेखील वाढेल. काही जबाबदारीची कामे आपल्याला आवर्जून दिली जाऊ शकतात. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी हे लाभकारकच ठरेल. विविध सहभाग वाढेल.
शुभ दिनांक - २३, २५, २६, २८.
 
 
कर्क (Cancer Zodiac) : व्यवहारात सावध असावे
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्यात सहाव्या कर्म स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे आणि पराक्रमेश शुक्र भाग्य स्थानात उच्च बलवान आहे. यामुळे या आठवड्याची सुरुवात आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या महत्त्वाच्या घटनेने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या निमित्ताने घडणे, एखादी मोठी संधी लाभणे, मोठी उद्दिष्ट्यपूर्ती वगैरे आपणास सुखावू शकतात. दरम्यान, आर्थिक व्यवहारात मात्र सावध असावे. तसेच कुणाला उधार, उसनवारी पैसे देण्याचा प्रसंग आल्यास सावध निर्णय घ्यावा. गुंतवणूक वगैरे सध्या टाळावी. हा आठवडा तसा विविध समारंभात सहभाग, भ्रमंती यात उत्साहात पार पडू शकतो.
शुभ दिनांक- २३, २७, २८,
 
 
सिंह (Leo Zodiac) : यशाची कमान उंचावणार
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीस चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या अतिशय शुभ स्थानातून सुरू होत आहे आणि राशिस्वामी रवी राशीवर दृष्टी ठेवीत सप्तम स्थानात आहे. यामुळे या आठवड्यात आपली रास बलवान झाली आहे. रवीसोबत बुध व शनी असले तरी त्यांचा फारसा विपरीत प्रभाव जाणवणार नाही. या सप्ताहात सर्वप्रकारच्या प्रयत्नांना उत्तम बळ मिळताना दिसेल. नोकरी-व्यवसायातील कामाचे कौतुक होईल. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. संततीस या आठवड्यात काही लक्षणीय यश लाभू शकेल. यशाची कमान उंचावेल. तथापि मनावर संयम ठेवले पाहिजे.
शुभ दिनांक - २३, २५, २६, १.
 
 
 
कन्या (Virgo Zodiac) : कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी
या आठवड्याच्या सुरुवातीस चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील स्थानातून होत आहे. त्याची दशम कर्मस्थानातील मंगळावर दृष्टी आहे. राशिस्वामी बुधही सहाव्या कर्मस्थानात आहे. या ग्रहस्थितीत आपले कर्म स्थान बलवान व अतिशय सक्रिय झाले आहे. त्यामुळे या आठवड्यात आपल्या व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण घडामोडी संभवतात. काही अपेक्षित बदल, अचानक घडणार्‍या घटना आनंददायक ठराव्यात. जबाबदारीने सोपविलेले काम पूर्ण दाखवाल. आर्थिक आवकदेखील वाढेल.
शुभ दिनांक - २३, २५, २७, २८.
 
 
तूळ (Libra Zodiac) : उत्साह व समाधान लाभेल
Weekly Horoscope : या आठवड्याच्या सुरुवातीस चंद्राचे भ्रमण आपल्या पराक्रम स्थानातून होत आहे. अशात राशिस्वामी शुक्र सहाव्या कर्मस्थानात बलवान स्थितीत आहे. त्यामुळे हा आठवडा आपणास व कुटुंबास प्रामुख्याने आनंदमय व कामात यश प्रदान करणारा राहील. काही घटनाही या सप्ताहात घडू शकतात. छोट्या छोट्या कामातूनही आपला उत्साह व समाधान दृष्टिगोचर होत राहील. कार्यक्षेत्रात मात्र सहकार्‍यांशी गोड बोलून काम काढून घेण्याचे तंत्र अवलंबावे लागेल. मित्र परिवार वा भाऊबंदकीत काही वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. काही मंडळींना प्रवासाचे योग संभवतात.
शुभ दिनांक - २३, २६, १.
 
 
वृश्चिक (Scorpio Zodiac) : जोखीम पत्करणे धोक्याचे
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीच्या धन स्थानातून होत आहे; मात्र सध्या राशिस्वामी मंगळ अष्टम स्थानात व्यथित आहे. त्यामुळे हा आठवडा आपणास काहीसा कष्टप्रद व मनाविरुद्ध घटनांनी युक्तठरू शकतो. या काळात काही मंडळींना आरोग्याचीदेखील काळजी घ्यावी लागू शकते. काहींना विशेषतः उष्णतेचे त्रास संभवतात. सप्ताहाच्या उत्तरार्धात स्वतःला जपावे. क्षमतेपेक्षा मोठी उडी मारू नका. मोठी जोखीम पत्करणे धोक्याचे राहील. सावध पवित्रा असावा. रस्तावर वाहने सावधपणे चालवा. कार्यक्षेत्रातील वातावरण जरा युक्तीने सांभाळावे. खर्चावर नियंत्रण हवे.
शुभ दिनांक - २३, २५, २७, २८.
 
 
धनु (Sagittarius Zodiac) : जोडीदाराकडून उत्तम प्रतिसाद
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या राशिस्थानातूनच प्रारंभ होत आहे राशिस्वामी गुरू सहाव्या कर्मस्थानात सक्रिय आहे. सध्या शुक्रासोबत एक उत्तम योग झालेला असल्याने गुरू फारच शुभदायी ठरणार आहे. यामुळे हा आठवडा आपले महत्त्व वाढीस लावणारा ठरू शकतो. जीवनातील जोडीदाराकडून, कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांकडून तसेच व्यावसायिक भागीदाराकडून उत्तम प्रतिसाद हे या आठवड्याचे मुख्य फलित ठरावे. आपल्या योजनांना बळ मिळेल. काही धाडसी निर्णय हरकत नाही. त्वरित लाभ दिसला नाही तरी उत्तम फले हाती येण्याची खात्री बाळगा.
शुभ दिनांक - २४, २५, २८, १.
 
 
मकर (Capricorn Zodiac) : खर्च, मानसिक अस्वस्थता
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील व्यय या खर्चवाढीच्या स्थानातून होत आहे. अशात राशिस्वामी शनी धनस्थानी रवीव व बुध या शत्रूंच्या वेढ्यात आहे. त्यामुळे सप्ताह काहीसा खर्चिक, मानसिक अस्वस्थता वाढविणारा ठरू शकतो. व्यावसायिक लाभासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. नोकरी, व्यवसायात सावध वावर ठेवावा. कोणाशीही वितुष्ट घेऊ नका. नोकरीसाठी प्रयत्नशील युवा वर्गास काही काळ वाट पाहावी लागू शकते. आर्थिक आवक सुरू असली तरी खर्च वाढू शकतो. प्रकृतीची कुरबूर असलेल्यांनी काळजी घ्यावी.
शुभ दिनांक - २५, २६, २७.
 
 
कुंभ (Aquarius Zodiac) :सर्वतोपरी उत्तम सप्ताह
या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीच्या लाभ स्थानातून सुरू होत आहे आणि राशिस्वामी शनी स्वतःच्याच राशीत आहे. शनी सध्या रवी व बुध या शत्रूंच्या वेढ्यात असला तरी तो स्वराशीत असल्याने पूर्णपणे सक्रिय आहे. शिवाय धनस्थानी योगकारक शुक्र आहे. त्यामुळे हा आठवडा सर्वतोपरी उत्तम जावा. अगोदर केलेल्या काही कार्याचा अचानक मोठा फायदा या आठवड्यात मिळू शकतो. आर्थिक लाभही घडावा. मुलांकडून अपेक्षित बातम्या कळू शकतात. त्यांचे यश सुखावून जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रवासाच्या योजना आखल्या जातील. विदेशात जाऊ इच्छिणार्‍यांच्या योजनांना दिशा मिळेल.
शुभ दिनांक - २४, २५, २७, १.
 
 
मीन (Pisces Zodiac) : अतिशय शुभकारक
Weekly Horoscope : या आठवड्याच्या प्रारंभी चंद्राचे भ्रमण आपल्या दशम कर्म स्थानातून होत आहे. शिवाय आपल्या राशीत शुक्र असून राशिस्वामी गुरू पराक्रम स्थानात आहे. गुरू-शुक्राचा शुभ स्वरूपाचा अन्योन्य योग झाला आहे. त्यामुळे हा आठवडा आपणास अतिशय शुभकारक व साडेसातीच्या त्रासात मोठा दिलासा देणारा ठरू शकेल. व्यवसायात आर्थिक लाभ व्हावा. नोकरीत महत्त्व वाढेल. जबाबदार्‍या आपल्याकडे सोपविल्या जातील. अधिकारी वर्गाची आपल्याकडून अपेक्षा वाढेल. त्याचा लाभही मिळू शकतो. कुटुंबातून उत्तम साथ मिळेल. वडीलधार्‍या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल.
शुभ दिनांक - २३, २४, २६, २८.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६
Powered By Sangraha 9.0