वचनबद्धतेला अनुसरून राहणारे "वीर सावरकर"

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी

    दिनांक :26-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Vinayak Damodar Savarkar सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ( २६ फेब्रुवारी ) आज पुण्यतिथी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म नाशिकच्या भगुर येथे झाला. वि. दा. सावरकर हे भारतातील महान क्रांतिकारकांपैकी एक होते. ब्रिटिशांविरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्मठेप सुनावण्यात आली होती. सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. अंदमानच्या कारावासातही सावरकरांनी आपले अजरामर काव्य रचले. अंदमानमधील सेल्युलर जेलमधील भिंतीवर कोरलेले सावरकरांचे राष्ट्रभक्तीपर काव्य आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देते.
 
 

Vinayak Damodar Savarkar 
कसे मिळाले 'स्वातंत्र्यवीर' हे नाव
सावरकर तुरुंगात असताना त्यांनी १८५७ च्या क्रांतीवर आधारित '१८५७ चे स्वातंत्र्य समर' हा सविस्तर मराठी ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ खूप गाजला आणि अत्रे यांनी सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ असे नाव दिले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेल्या 'ने मजसी ने परतमातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..' या काव्याला १० डिसेंबरला 2023 रोजी 114 वर्षे पूर्ण झाली. २७ मे १९३८ रोजी 'मराठा' या वृत्तपत्रात हे काव्य प्रसिद्ध झाले. भा. द. खेर यांनी लिहिलेल्या सावरकरचरित्रात तात्यारावांनी १० डिसेंबर १९०९ रोजी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख केला आहे.
काळ्या पाण्याची शिक्षा
इंग्लंडमधून भारतात परतताच, सावरकर आणि त्यांचे भाऊ गणेश यांनी 'भारतीय परिषद कायदा 1909' विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. (मिंटो-मॉर्ले फॉर्म). विनायक सावरकर म्हणाले की, ब्रिटीश पोलिसांनी त्यांना गुन्हेगार ठरवल्यानंतर गुन्ह्याचा कट रचल्याच्या गुन्ह्यासाठी त्यांच्या वर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अटकेत राहू नये म्हणून सावरकर पॅरिसला गेले. त्यानंतर 1910 मध्ये सावरकरांना ब्रिटीश पोलिसांनी पकडले. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या खटल्यासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आले आणि त्यांना 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. 4 जुलै 1911 मध्ये त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलमध्ये टाकण्यात आलं. त्या काळात त्यांच्यावर सतत अत्याचार झाले. हिंदुत्वाचा प्रसार संपूर्ण राष्ट्रात करण्यासाठी सावरकरांनी तुरुंगात असताना हिंदुत्व: हिंदू कोण आहे या शीर्षकाची वैचारिक पत्रके तयार करुन वितरीत केली. जी कालांतराने संपूर्ण देशात पसरली. सावरकरांच्या समर्थकांकडून त्यांना भरपूर पाठिंबा मिळाला.
विनायक दामोदर सावरकर यांनी 83व्या वर्षी १ फेब्रुवारी 1966 पासून अन्न, औषध, पाणी या सर्वांचा त्याग केला. हळूहळू त्यांची प्रकृती खालावली आणि 26 फेब्रुवारी 1966 त्यांनी अखेरचा श्वास घेतला.