मुंबई,
Cocaine smugglers arrested : अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई झोनल युनिटने विविध भागात कारवाई करीत ११.५ किलो कोकेन आणि ५ किलो गांजासह दीड लाखांची जप्त केली. या कारवाईत चार तस्करांना अटक करण्यात आली. एका अधिकार्याने सांगितले की, सागरी मार्गाने विदेशातून मुंबईत आलेल्या ड्रग्जला तस्करांच्या माध्यमातून विविध भागात पोहोचविण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
Cocaine smugglers arrested : त्या आधारे दादर, अंधेरी आणि ठाणे भागातून चार तस्करांकडून ११.५ किलो कोकेन, ५ किलो गांजा आणि रोख जप्त करण्यात कोकेन अमेरिकेतून मुंबईत आणल्याचे तपासात उघड झाले. ड्रग्जच्या तस्करीत परदेशी नागरिकांच्या एक गटाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. ड्रग्ज कुरिअर, कार्गो सेवा आणि मानवी वाहकांच्या मदतीने भारत आणि परदेशातील विविध प्राप्तकर्त्यांना पाठवले जात होते. याप्रकरणात आणखी काही स्थानिक लोकांचा सहभाग असून, त्यांना अटक केली जाणार आहे.