- उदय सामंत यांची माहिती
मुंबई,
बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्ष खरी शिवसेना असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलाने उबाठातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून टप्प्याटप्प्याने त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती मंत्री Uday Samant उदय सामंत यांनी दिली.
पत्रपरिषदेत सामंत म्हणाले, कोणतेही मिशन सांगून राबवले जात नाही. मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाचा झपाटा पाहता, त्यांना कुठलेही मिशन राबवण्याची गरज नाही. बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चालते, हे अनेक जणांना कळून चुकले आहे, त्यामुळे उबाठासह इतर पक्षातील अनेक जण संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने पक्षात प्रवेश होणार आहे. मी पुढील ९० दिवसांत मोठा पक्षप्रवेश होणार असे सांगितले, एक दिवस २४ तासांत होणार असे म्हटले नव्हते. रत्नागिरीत जो कार्यक्रम करून दाखवला, ती झलक होती. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील १० ते १२ माजी आमदार शिवसेनेत येणार, यावर मी ठाम आहे. एकनाथ शिंदेंचे नेतृत्व ठाकरेंपेक्षा भावनाशील आहे, असे अनेकांचे मत आहे, असे Uday Samant सामंत यांनी सांगितले.