जानेवारीमध्ये देशात २२.९१ लाख वाहनांची विक्री

07 Feb 2025 19:39:58
नवी दिल्ली, 
Vehicle sales जानेवारी महिन्यात देशात वाहन विक्रीमध्ये वार्षिक आधारावर ७ टक्क्यांची वाढ झाली असून सुमारे २२.९१ लाख वाहने विकली गेली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने दिली. गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये एकूण किरकोळ विक्री २१.४९ लाख इतकी होती. प्रवासी वाहनांपासून वाणिज्य वापराच्या प्रत्येक वाहन श्रेणीमध्ये जानेवारी महिन्यात सकारात्मक गती दिसून आली, जी वाहन बाजारपेठेत उत्साह परतत असल्याचे संकेत देते.
 
 
Vehicle sales
 
Vehicle sales गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत १६ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४.६५ पोहोचल्याची माहिती ‘फाडा’चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी दिली. गेल्या महिन्यात दुचाकींची किरकोळ विक्री १५.२५ लाखांवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात १४.६५ लाख होती. त्यात सुमारे ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरी भागातील विक्री ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक राहिली आहे. कंपन्यांकडून नवीन वाहनांचे सादरीकरण, लग्नाच्या हंगामातील मागणी आणि वित्तपुरवठा हे वाढीचे प्रमुख कारण असल्याचे विघ्नेश्वर म्हणाले. वाणिज्य वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ८ टक्क्यांनी वाढून ९९,४२५ वर पोहोचली, तर ट्रॅक्टर विक्री वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढून ९३,३८१ वर पोहोचली.
Powered By Sangraha 9.0