मद्यधोरणात आप बुडाली, पैशांवर होते लक्ष

    दिनांक :08-Feb-2025
Total Views |
- अण्णा हजारे यांचा घणाघात
 
मुंबई, 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने २६ वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर सत्ता प्राप्त केली. या पक्षाने आम आदमी पार्टीचा दणदणीत पराभव केला. कधीकाळी अरविंद यांचे गुरू राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare अण्णा हजारे यांनी आपच्या पराभवावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. हा पक्ष मद्यधोरणात बुडाला. या पक्षाचे केवळ पैशांवर लक्ष होते, असे अण्णा हजारे म्हणाले. उमेदवाराचे चारित्र्य स्वच्छ असले पाहिजे आणि त्याला त्यागाचे गुण माहीत असले पाहिजे, असा घणाघात अण्णा हजारे यांनी केजरीवालांवर केला. अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेला आम आदमी पार्टीचा भाजपाने दिल्ली विधानसक्षभेच्या निवडणुकीत दारुण पराभव केला.
 
 
Anna Hazare
 
मद्यधोरणाच्या मुद्यात पैसा आला, त्यावेळी केजरीवालांचा पक्ष त्यात बुडाला आणि या पक्षाची प्रतिमा खराब झाली. अरविंद केजरीवाल यांच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल लोक बोलायचे, आता ते मद्यधोरणाबद्दल बोलतात, असे अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे पत्रकारांसोबत चर्चा करताना निःस्वार्थपणे लोकांची सेवा करण्याची गरज आपने समजून घेतली नाही, या पक्षाने चुकीचा मार्ग धरला. पैशाने आघाडी घेतली, त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे Anna Hazare अण्णा हजारे यांनी म्हटले.
 
२०१२ मध्ये मार्ग वेगळा
अरविंद केजरीवाल यांनी २०१२ मध्ये आम आदमी पार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अण्णा हजारे आणि त्यांचा मार्ग वेगळा झाला आपची स्थापना झाल्यानंतर मी राजकारणापासून दूर राहिलो, असे हजारे म्हणाले. मी सुरुवातीपासूनच सांगत आलो की, जेव्हा कुणी निवडणूक लढवतो, तेव्हा त्याचे चारित्र्य स्वच्छ आणि निष्कलंक असले पाहिजे. उमेदवाराला त्यागाचे गुण माहिती असले पाहिजे आणि अपमान सहन करण्याची क्षमता हवी, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.