मुंबई,
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतील मतदारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. भाजपाची आणि रालोआची विजयी घौडदौड सुरूच आहे. आजचा विजय पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीची आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे अभिनंदन केले.
Eknath Shinde : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, दिल्लीकरांवर गेली १० वर्षे असलेले ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणार्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी चित केले. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकरमतदारांना मनापासून धन्यवाद देतो. घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहर उमटवली. देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला.