मुंबई,
Crime Patrol लोकप्रिय अभिनेता अनुप सोनी पुन्हा एकदा सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध गुन्हेगारी शो 'क्राइम पेट्रोल'सोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नव्या सीझनमध्ये २६ सर्वात कठीण आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या खून रहस्यांची उकल केली जाणार आहे. हे २६ नवे प्रकरणे आणि त्यांची गुंतागुंतीची तपास प्रक्रिया प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील.
अनुप सोनी बर्याच काळापासून 'क्राइम पेट्रोल'शी जोडलेले आहेत आणि त्यांच्या सादरीकरणाची शैली आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. या नव्या सीझनच्या प्रीमियर तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र शोचा नव्या प्रोमोने आधीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
शोच्या पुनरागमनाबद्दल आपला आनंद व्यक्त करताना अनुप सोनी म्हणाले, "'क्राइम पेट्रोल' त्याच्या रोमांचक आणि सत्य घटनांवर आधारित कथांमुळे नेहमीच प्रेक्षकांचे आवडते राहिले आहे. या नव्या सीझनमध्ये सस्पेन्स अधिक तीव्र असेल आणि प्रत्येक भागात गुन्ह्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाईल. सूत्रसंचालकाची भूमिका पुन्हा साकारताना मला खूप आनंद होत आहे. या शोमधील प्रत्येक प्रकरण प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल आणि सत्य उघड करण्याचा थरार अनुभवायला मिळेल."
सत्य घटनांवर आधारित या प्रकरणांमध्ये गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याच्या गुंतागुंतीच्या तपास प्रक्रियांचा मागोवा घेतला जाईल. यंदाचा सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे वचन देतो, आणि अनुप सोनांच्या परताव्यामुळे शोमध्ये अधिक रोमांचकता निर्माण होईल.