शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज पुरवठा करा

    दिनांक :15-Mar-2025
Total Views |
कुरखेडा,
Krishna Gajabe संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा आदिवासी दुर्गम व नक्षलग्रस्त असून आकांक्षीत जिल्हा आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार गडचिरोली हा राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा गरीब जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण नागरिक केवळ शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांची उपजीविका शेतीच्या उत्पन्नावर बाराही महिने चालत असल्याने विद्युत विभागाने शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना 12 तास नियमित दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केली आहे.
 
 
Krishna Gajabe
 
पुरेसा पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नद्यांना बाराही महिने पाणी उपलब्ध राहत असल्याने शेतकरी रब्बी व खरीप हंगामात प्रामुख्याने धान पिकाची व सोबतच भाजीपाला पिकाची लागवड करतात. परंतु धान पिकाला पुरेसा पाणी होत नसल्याने धान पीक करपल्या जात आहे. सोबतच वन्यप्राणी सुद्धा आरमोरी विधानसभा क्षेत्रात धुमाकूळ माजवत असून शेतकर्‍यांचा जीव धोक्यात आलेला आहे. Krishna Gajabe असे असताना सुद्धा शेतकरी जीव धोक्यात घालून शेतावर मोटार चालू करण्याकरिता व इतर ठिकाणी पाणी वागविण्याकरिता जातात. मात्र रात्रीच्यावेळी शेतात जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना दिवसा 12 तास नियमित वीजपुरवठा केल्यास शेतकर्‍यांना सोयीचे होईल.
 
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा, कोरची, वडसा, आरमोरी मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना विशेष बाब अंतर्गत दिवसा 12 तास वीज पुरवठा नियमित देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी कुरखेडाचे उपविभागीय अभियंता मिथुन मुरकुटे यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. Krishna Gajabe यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती व्यंकटी नागीलरवार, उल्लास देशमुख, राहूल गिरडकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.