शीर आणि पाय तोडलेला 'तो' मृतदेह माऊलीचा!

    दिनांक :18-Mar-2025
Total Views |
श्रीगोंदा
Ahilyanagar Murder अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी हद्दीत असलेल्या दाणेवाडी गावातील एका विहिरीत 12 मार्च रोजी एक अनोळखी मृतदेह आढळला. मृतदेहाचे शीर आणि पाय तोडून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. तर दुसरीकडे याच दाणेवाडी गावातील माजी सरपंच अनिल गव्हाणे यांचा 19 वर्षीय पुतण्या माऊली गव्हाणे हा देखील 6 मार्चपासून शिरूर येथून बेपत्ता झाला होता. 12 मार्चला दाणेवाडी गावातील विहिरीमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत आढळलेला मृतदेह माऊलीचाच असावा असा संशय व्यक्त होत असताना दाणेवाडीतील आणखी एका विहिरीत एक शीर आणि काही अवयव एका गोणीत फेकून दिल्याचे आढळून आले.
 
 
Ahilyanagar Murder
 
दरम्यान या शीराच्या कानातील बाळीवरून हा मृतदेह हा माऊलीचाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दाणेवाडी गावावर शोककळा पसरली. माऊलीची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. समलैगिंक संबधांतून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते. ही बाब मयत माऊली गव्हाणेला समजली होती. याच कारणातून माऊलीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. Ahilyanagar Murder माऊली आपल्या समलैंगिक संबंधांची गावात वाच्यता करेन, या भीतीपोटी आरोपींनी दीड महिन्यापूर्वी कट शिजवला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या योग्य तपासामुळे काही दिवसांतच आरोपींना ताब्यात घेऊन सत्य समोर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी तपासाला गती मिळाली आणि या प्रकरणाचा तपास झाला.