अतिरिक्त महापालिका आयुक्त गोयल यांची बदली

सहा आयएएस अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या

    दिनांक :18-Mar-2025
Total Views |
नागपूर, 
Aanchal Goyal : शहरात दोन गटांत तणाव आणि मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना असताना सहा आयएएस अधिकार्‍यांच्या तडकाफडकी बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. यात प्रामुख्याने नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आंचल गोयल यांची बदली करण्यात आली आहे. आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी आली आहे.
 
 
 
GOYAL
 
 
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीतील आयएएस अधिकारी रजणीत यादव यांना वेगळा पदभार देण्यात आला आहे. गत महिन्याभरापासून राज्यातील सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचा सपाटाच लावला आहे. राज्य सरकारकडून १५ दिवसांपूर्वीच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आला होत्या. आता, पुन्हा एकदा आयएएस ६ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आहेत. नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि नांदेड येथील अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे.