शहरातले 5 खेळाडू राज्य संघात

18 Mar 2025 20:09:22
नागपूर, 
National Basketball Tournament  : गुवाहाटी (आसाम) येथे 18 मार्चपासून सुरू झालेल्या 23 वर्षाखालील बास्केटबॉल स्पर्धेत शहरातील 5 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 22 मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सिया देवधर, धारा फाटे, शोमिरा बिडये, गुंजन मंत्री व राजवी मालाधारी या महिला बास्केटबॉलपटूंची निवड करण्यात आली आहे.
 
 
 
Basketball
 
 
 
विशेष म्हणजे मुंबईतील निवड चाचणीत या पाचही खेळाडू होत्या. या सर्वांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यांच्या व्यतिरिक्त उत्तर मुंबई , दक्षिण मुंबई, कोल्हापूर, मुंबई (दक्षिण-पूर्व), पुणे व साताराचे खेळाडू सामिल आहेत. जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कालच 17 मार्चला महिलांचा बास्केटबॉलचा संघ गुवाहटीला (आसाम) रवाना झाला.
 
 
महिलांचा बास्केटबॉलचा संघ:
 
नागपूर: सिया देवधर, धारा फाटे, शोमिरा बिडये, गुंजन मंत्री व राजवी मालाधारी,
मुंबई (उत्तर): सुजेन पिंटो, कोल्हापूर : सानिका फुले, मुंबई (दक्षिण-पूर्व): अमीषा जोस, अंकिता कुमारी, पुणे : भूमिका सार्जे, मानसी निर्मलकर, सातारा: अविशा गुरव, मुख्य प्रशिक्षक: निजार अहमद कोया, सहप्रशिक्षक: सोनेश जोरे.
Powered By Sangraha 9.0