आलिया भट माझी दुसरी पत्नी

21 Mar 2025 14:11:06
मुंबई,
Alia Bhatt Ranbir Kapoor बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांनी ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ या चित्रपटात एकत्र काम केले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र, अलीकडेच रणबीरने एका मुलाखतीत असा धक्कादायक खुलासा केला आहे की, आलिया ही त्याची दुसरी पत्नी आहे.
 

Alia Bhatt Ranbir Kapoor  
पहिल्या लग्नाबाबतचा किस्सा
मॅशेबल इंडिया या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आपल्या "पहिल्या लग्ना"बद्दल सांगितले. तो म्हणाला, "मी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असताना एक मुलगी माझ्या घरी आली होती. ती केवळ आलीच नाही तर तिने पुजारी आणि लग्नाची सर्व तयारीही सोबत आणली होती. त्या मुलीने माझ्या घराबाहेरच्या गेटवर माझ्याशी लग्न केले. विशेष म्हणजे, त्यावेळी मी घरी नव्हतो. बाहेरून परतल्यावर गार्डने मला ही संपूर्ण घटना सांगितली."
 
रणबीर पुढे म्हणाला, "मी घराच्या गेटवर टिळक आणि फुले विखुरलेली पाहिली. या घटनेनुसार, ती मुलगी माझी पहिली पत्नी आहे. जरी मी तिला आजपर्यंत कधी भेटलो नाही, तरी भविष्यात तिला भेटण्याची इच्छा आहे."
 
रणबीरच्या या खुलाशानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आलिया भट्टसोबत संसार करणाऱ्या रणबीरच्या या किस्स्याने सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Powered By Sangraha 9.0