नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकर्‍यापुढे पिके वाचविण्याचे संकट

21 Mar 2025 16:43:39
मानोरा,
Farmers face a crisis to save crops तालुयातील इंगलवाडी ह्या गावात मागील १३ तारखेला नादुरुस्त झालेला वीज वितरण कंपनी प्रशासनाचा रोहित्र आठ दिवस होऊनही दुरुस्त करण्यात न आल्याने या रोहित्राच्या माध्यमातून सिंचन करणारे शेतकरी धास्तावले असून, तातडीने रोहित्राची व्यवस्था न केल्यास उन्हाळी पिके रणरणत्या उन्हात भस्मसात होण्याची भीती निर्माण झाल्याचे वास्तव चित्र पुढे येत आहे.
 
 Farmers
 
शेंदुर्जना आढाव सब स्टेशनवरून इंगलवाडी या गावातील व शेत शिवारातील कृषी ग्राहक तथा गृह उपयोगी ग्राहकांना वीज पुरवठा केल्या जाते. Farmers face a crisis to save crops इंगलवाडी येथील ४० ते ६० एकर शेतशिवारात उन्हाळी मुंग तथा २५ एकरात उन्हाळी भुईमूग व पाच ते दहा एकर शिवारात उन्हाळी ज्वारीची पेरणी शेतकर्‍यांनी केली असून, या उन्हाळी पिकांना ज्या रोहित्रावरून वीज पुरवठा होतो, ते रोहित्र १३ तारखेला नादुरुस्त झाले होते.
 
नादुरुस्त रोहित्राच्या ठिकाणी १८ तारखेला सायंकाळी बसविलेल्या रोहित्र रात्रभर चार्जिंग केल्यानंतरही हे रोहित्र १९ तारखेला परत फेल झाल्यामुळे विजे अभावी मागील आठवड्यापासून उन्हाळी पिके आता कोमेजायला लागलेली आहे. Farmers face a crisis to save crops महागडी बी बियाणे पेरून चांगल्या पिकाची अपेक्षा करून बसलेल्या शेतकर्‍यांसाठी वीज वितरण कंपनी प्रशासनाने तातडीने हालचाली करून इंगलवाडीला जळालेल्या रोहित्राच्या जागी नवे व पुढे काम देणारे रोहित्र बसवण्याची मागणी धास्तावलेल्या शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0