पटवाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित
तुमसर,
Confusion in agricultural aid पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुरामुळे बाधित झालेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई देताना तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल आणि गोंडीटोला येथील घोळ प्रकरणात तहसीलदारांनी पटवऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. दरम्यान या घोळ प्रकरणातील सहा बोगस लाभार्थ्यांपैकी चार लाभार्थ्यांकडून दिलेली नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहे.
सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी शेतात शिरून काही गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले होते. तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल आणि गोंडीटोला ही दोन्ही गावे नदी काठावर असल्याने नुकसान भरपाईसाठी प्रभावित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. मात्र हे करताना पटवारी, कोतवाल यांनी काही विशिष्ट लोकांसाठी लाभ देण्याचे हेतूने नुकसान भरपाईच्या वाटपात घोळ केला. Confusion in agricultural aid 0.77 आर हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 47 हजार सहाशे रुपये मदत दिली गेली.. एकच गट क्रमांक वर चार नाव असलेल्यांना प्रत्येकी 48 हजार 600 रुपये प्रमाणे चौघांनाही मदत देण्यात आली. ज्या शेतात पाणी शिरले नाही, किंवा साधे पाणीही टेकले नाही अशा शेती बाधित दाखवून त्यांनाही लाभार्थ्यांच्या यादीत आणण्यात आले. सुकळी गावातील एकाच कुटुंबाला तीन लाखाहून अधिक आर्थिक मदत देण्यात आली.
आर्थिक मदतीच्या या यादीत घोळ झाल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येतात हा विषय चांगला चर्चेत आला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची तहसीलदारांनी चौकशी केली. Confusion in agricultural aid त्यात घोळ झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्यासंदर्भात असलेले सर्व दस्तऐवज तहसीलदारांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. प्रकरणात दोष आढळल्याने तुमसर चे तहसीलदार टिकले यांनी पटवारी यांची विभागीय चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे.
दरम्यान या घोळ प्रकरणात आतापर्यंत सहा बोगस लाभार्थ्यांपैकी 4 दिली गेलेली मदतीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे तहसीलदारांनी सांगितल. इतर दोन बोगस लाभार्थी लवकरच ही रक्कम जमा करतील असेही तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले यांनी तरुण भारताशी बोलताना सांगितले. Confusion in agricultural aid बोगस लाभार्थ्यांची नावे टाकून मदतीच्या रकमेत घोळ घालण्याच्या प्रकरणात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात काही बड्या असामीही सहभागी असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.