गडचिरोली,
Gosekhurd Dharne गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी 8 दिवसांच्या आत गोसेखुर्द धरणाचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा वैनगंगा नदी पात्रात ठीय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मवाडे यांनी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून दिला आहे.

गडचिरोली हा अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात बारमाही वाहणार्या वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी सारख्या मोठ्या नद्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात होणार्या अतिवृष्टीमुळे तर कधी गोसेखुर्द धरणातील विसर्ग किंवा मेडीगट्टा धरणातील बॅक वाटरमुळे जिल्ह्यात वारंवार पुरस्थिती निर्माण होते व जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असते. Gosekhurd Dharne या त्रासाला कंटाळून व झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी नदी काठावरील अनेक शेतकरी उन्हाळी पिक घेतात. मात्र गोसेखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्याने गडचिरोली जिल्ह्यात वाहणार्या नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली असून शेतकर्यांना आता शेती करायला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सोबतच अनेक पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्याची अडचण येत आहे. नदी काठावरील गावातील भूजल पातळी सुद्धा कमी झाल्याने अनेक गावकर्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण होत आहे. सदर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन 8 दिवसांच्या आत गोसेखुर्द धरणातील पाणी तातडीने सोडण्यात यावे व जिल्ह्यातील शेतकरी, गावकरी यांच्या पाण्याची अडचण दूर करावी, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. Gosekhurd Dharne 8 दिवसांच्या आत मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने हजारो शेतकरी व नदी काठावरील गावकर्यांना घेऊन वैनगंगा नदी पात्रात ठीय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.