शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

    दिनांक :22-Mar-2025
Total Views |
नागपूर,
March 24 Shahid Din -२४ मार्च,सोमवारी निमाद्वारे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालय, नागपूर व राष्ट्रीय सेवा योजना, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या ९४ व्या बलिदान दिवस प्रित्यर्थ सोमवारी २४ मार्च रोजी सकाळी १० ते ३ यावेळेत वार्ड क्र. ३, शल्यतंत्र विभाग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. शिबिराचे उद्घाटन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सोनेकर यांच्या हस्ते संपन्न होईल.
 
 
 
raket
या कार्यक्रमाला निमा केंद्रीय शाखेचे डॉ. रवींद्र बोथरा, डॉ. प्रवीण डांगोरे, डॉ. मृण्मयी मासोदकर, राज्य शाखेचे उपाध्यक्ष डॉ. पंकज भोयर व विभागीय सचिव डॉ. राहुल राऊत डॉ. मोहन येंडे, डॉ. मीनाक्षी सराटकर, निमा नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन कानोलकर डॉ. शरद ठाकूर, डॉ. पंकज थूल, March 24 Shahid Din डॉ. विना फाये, डॉ. ममता रेवतकर, डॉ. वैशाली चरडे व प्रकल्प अधिकारी डॉ. शांतीदास लुंगे, डॉ.गणेश टेकाडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष राणा, सहकार्यकारी अधिकारी डॉ. कल्पना चव्हाण व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना शिंदे प्रशासकीय अधिकारी अविनाश देशपांडे प्रामुख्याने उपस्थित राहतील. शहीद दिवसाचे महत्त्व समजून संघटनेने रक्तदान संकल्पना सामाजिक बांधिलकी म्हणून पूर्ण करून आपली समाजा विषयीची जबाबदारी पूर्ण करावयाची आहे. व ती संकल्पना पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी डॉ. शैलेंद्र अग्रवाल, डॉ.विकास चीटमुलवार, डॉ. मनीष भोयर, डॉ. सुमती जैन, डॉ. दिलीप फाये, डॉ. हुसेन, डॉ. मेश्राम, डॉ. राजू कोसे, डॉ. विनोद गंभीर, डॉ. तुरनकर, डॉ.विवेक येवले, डॉ. शेखर तनमने, डॉ. आलम आदी प्रयत्नशील आहे.
सौजन्य: देवराव प्रधान,संपर्क मित्र