लवकरच सुटणार 'मुसकान आणि साहिल'...का ?

हत्या करण्यात आलेली "ती" रूम...

    दिनांक :23-Mar-2025
Total Views |
उत्तर प्रदेश
Saurabh Rajput murder case उत्तर प्रदेशातील गाजलेल्या सौरभ हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य आरोपी साहिलचे घर अद्याप सील करण्यात आलेले नसल्याने महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
 
Saurabh Rajput murder case
 
 
 
सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात पोलिस अपयशी
 
या प्रकरणात Saurabh Rajput murder case  पोलिसांना अद्याप हत्येचा कट कसा रचला गेला, यासंदर्भातील ठोस पुरावे मिळवता आलेले नाहीत. मास्टरमाइंड मुस्कानने हत्येसाठी आवश्यक साहित्य ज्या ठिकाणांहून खरेदी केले, त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळवता आले नाही. घटनेला १५ दिवस उलटून गेल्याने बहुतेक ठिकाणांचे सीसीटीव्ही बॅकअप आधीच नष्ट करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने हे फुटेज परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मुस्कानने खैरनगरमधील मेडिकल स्टोअरमधून औषध, शारदा रोडवरून चाकू आणि जाली कोठी परिसरातून ड्रम खरेदी केल्याचे समोर आले आहे. मात्र, या सर्व ठिकाणी तपास करूनही कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळालेले नाही.
 
 
शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचे खुलासे
 
 
सौरभच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या छातीवर चाकूने तीन वार झाल्याचे आणि मान क्रूरपणे कापण्यात आल्याचे उघड झाले आहे. तसेच दोन्ही हात मनगटांपासून छाटले गेले होते. विशेष म्हणजे, मृतदेह १५ दिवसांनंतर सापडल्याने त्याला कोणतेही भूल किंवा विषबाधा झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे व्हिसेरा नमुना जतन करण्यात आलेला नाही.पोलिस पथक या हत्याकांडाच्या तपासासाठी शिमलाला पोहोचले आहे. तिथून काही महत्त्वाचे सुगावे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, पोलिसांनी साहिलचे घर का सील केले नाही? या गंभीर त्रुटीमुळे तपासात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.
 
 
इन्स्पेक्टर ब्रह्मपुरी यांच्यावर चौकशीचे आदेश
 
 
एसपी सिटी आयुष बिक्रम सिंह यांनी स्पष्ट केले की, सुरुवातीला या प्रकरणाचा तपास एसएसआय ब्रह्मपुरी करमवीर सिंह यांच्याकडे होता. मात्र, नंतर ही जबाबदारी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्या निष्काळजीपणामुळे तपास त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.आता या निष्काळजीपणामागे कोणाचा हात आहे आणि पोलिसांमध्ये कोणतेही संगनमत आहे का, याची सखोल चौकशी सुरू आहे. एसएसपींनी या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवले असून, लवकरच दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.