लिनिअर अ‍ॅक्सेलेरेटरवरील सीमा शुल्क माफ करा

25 Mar 2025 22:04:37
नागपूर, 
Nagpur News : कर्करुग्णावर उपचारासाठी लिनियर अ‍ॅक्सेलेरेटर यंत्र मेडिकलमध्ये बसविले जाणार आहे. राज्य शासनाने हे यंत्र खरेदी करण्यासाठी 2018 मध्ये 23.20 काेटींना प्रशासकीय मान्यता दिली हाेती. परंतु, विविध कारणांमुळे खरेदी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. दरम्यान, महागाई, सीमाशुल्क व इतर 34.64 टक्के करांमुळे 23 काेटी रुपयांच्या यंत्राची किंमत 48 काेटी रुपये झाली. या पार्श्वभूमीवर सीमा शुल्क माफ करण्यासाठी केंद्रीय सीमा शुल्क विभागाकडे विनंती करण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली.
 
 
 
11
 
 
 
विदर्भाच्या शासकीय रुग्णालयांच्या विकासाबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्या. अविनाश घराेटे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. सीमा शुल्क कायदा, 1962 मधील कलम 28 (अ) नुसार लिनिअर अ‍ॅक्सेलेरेटर यंत्रावर लावण्यात येणारे सीमा शुल्क मा\ करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र राज्य शासनाने केंद्रीय सीमा शुल्क आयुक्तांना 19 मार्च राेजी दिले. या विनंतीवर विभागाकडून काय निर्णय दिला जाताे, याबाबत 4 एप्रिलपर्यंत न्यायालयात माहिती सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने केली. याशिवाय आकारण्यात येणाèया देखभाल शुल्काबाबतही न्यायालयाने विचार करण्याचा सल्ला दिला. प्रतिवर्ष एक काेटीचे देखभाल शुल्क अवाजवी असल्याचे मत नाेंदवित ते कमी करण्याची आवश्यकता न्यायालयाने व्यक्त केली.
 
 
दुसरीकडे, मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतीक्षालय उभारण्याबाबत 12 सप्टेंबर 2024 राेजी कार्यदिश काढला गेला असून 20 जुलैपर्यंत आठ प्रतीक्षालय तयार केले जातील, अशी हमी मेडिकल प्रशासनाने न्यायालयाला दिली.
Powered By Sangraha 9.0